(जस्ट इमॅजीन)
ती : तुझ्या जवळ येण्याचा पर्याय आहे.. माझ्याकडे
.
(माझ्या मनात..आलं... . हिच्या मनात एखादा खुन वगैरे तरं नाही ना चाललं)
मी : काय..??
(ती थोड थांबून)
ती : घे कॉफी घे,,,
मी : हां
ती : तुझ्या पत्नीसह, तुझ्या अडचणींसह मी तुला आपलं करायला तयार आहे.. तुझ्याशी लग्न करायला तयार आहे... फक्त तुला कायमचं पुण्यात याव लागेल...
मी : ते कसं शक्य आहे???
ती : तु कॉफी घेतलीस का थंड होईल
मी : हां
ती : तु जश्या दोन कॉफ्या पचवल्यास ना, तश्या दोन बायका ही पचवू शकतोस..
(अरे यार कसलं, काय उदाहरण दिलं हिने..
च्या मारी हिने ही दोन कॉफी पिल्या मग...... ही पण... पण तोंडात आलेले शब्द गिळले..)
(तो मागचा मुलगा, आ वासून माझ्याकडे पहात होता)
मी : आता मी सांगतोय ते निट ऐक
तुला माझ्या कविता खूप आवडतात, बरोबर
ती : हो
मी : तुझी माझी मैत्री अशीच राहू दे, तुला फेसबुकवर माझ्या आणि माझ्यापेक्षा जास्त सरस लोकांच्या कविता वाचायला मिळतील..आणि तू खूपच सुंदर आहेस त्यामुळे माझ्यापेक्षा सुंदर आणि हुशार जोडीदार मिळेल, तू आपल्या लग्नाचा विचार मनातून तू काढून टाक.. आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो.. (मला पुन्हा विशाची परीक्षा घ्यायची नसल्याने मी बोलून मोकळा झालो)
(तीच्या डोळ्यातून पाण्याच्या सरी कोसळत होत्या.. ती भरल्या कंठाने बोलत होती)
ती : तुझ्या मनात असा विचार तरी कसा आला, मी दुसर्याशी लग्न करेन, आणि तुझ्याशिवाय जगू शकेन.
मी : असं अभद्र बोलू नकोस.. जिवन खूप सुंदर आहे.. आणि सुंदर लोकांनी सुंदरच विचार करायचा असतो..
(मागे बसलेला मुलगा आता उठला, आणि अक्षदा च्या शेजारी बसला.. मी अश्चर्याने त्याच्याकडे पहात होतो.. अक्षदा धुमसत हुंदके देत होती)
तो : मी अमित.. अक्षदा च्या सर्वात जवळचा मित्र आणि मोठा भाऊ..
(मला आणखी एक धक्का बसला, आता फक्त हार्ट फेल व्हायच बाकी होतं)
अरे मित्रा ही माझी बहिण खूप लाडात वाढलेली आहे.. तिला घरी कोणी काही बोलत नाहीत.. तिचा खूप लाड करतात अगदी मीही... तिच्या हट्टापायी मी इथपर्यंत आलो आहे... तु प्लीज नाही म्हणू नको.. तूला काहीही कमी पडू देणार नाही.. जेव्हा तूला ती मेसेज मध्ये काही बाई बोलली तेव्हा ती खूप रडली.. दोन दिवस कोणाशीही काही बोलली नाही.. अगदी माझ्याशी ही.. आणि नंतर तिने साइट वर बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरून अचानक खाली उडी मारली.. त्यामुळे तिच्या पायाला इजा झाली.. अॉपरेशन मध्ये सळ्या घातल्या गेल्या.. अजूनही प्लॅस्टर आहे पायाला तू पाहू शकतोस, ही तुमच्या लेखनातील कथा नाही,,,, आणि ती शुद्धीवर आली तेव्हा खूप रडू लागली आणि तिने पुढची सर्व हकिकत सांगितली.. आणि सारख म्हणत होती "त्याच्याशिवाय जगायचं नाही मला"... पण मला काहीच सुचत नव्हतं.. वाटलं दोन मुस्काटात ठेवून द्याव्यात... पण मी तसं काही केलं नाही.. खूप समजवलं तुझ्यापेक्षा सरस मुलगा आणून देतो.. पुन्हा असले फालतू विचार मनात आणू नकोस..
तीची ऐकून घेण्याची मनःस्थिती दाखवेना.. मग मी म्हणालो आधी बरी हो मग बोलून घेतो त्याच्याशी..
आणि तुझ लग्न लावून देतो.. तीने उडी मारली हे घरी न सांगता, पाय घसरून पडली असचं सांगितलं आहे.. मी तिला वारंवार सारखा समजावण्याचा प्रयत्न करतोय पण आजून ही ऐकत नाही.. प्लीज तू तरी हट्ट सोड आणि तिच्याशी लग्न करं..
(म्हणतात ना प्यार में सब अंधे हो जाते है.. आणि दिल गधेपर आया तो परी क्या चिज है..)
क्रमशः
___मनोज भिलारे

No comments:
Post a Comment