(जस्ट इमॅजीन)
विचारत विचारत कार्यालयात पोहोचलो... आणि आलो आहे हे दाखविण्यासाठी सुहास समोर जात दुरूनच हात केला.. त्यानेही तत्काळ जागेवरून हात जोडून स्वागत केले,, नुकतीच हळदी लागन चालू होती.. नवरा नवरीला हळदीची पाच पाच बोट उठवून आरती ओवाळून बायका जात होत्या. कंन्ट्रोलच्या (रेशनिंगच्या) दुकानात जशी बारी (रांग) लावतात तशी बायकांची रांग लागली होती..
नवरा नवरीला हळद लावताच ह्या परस्परांमध्ये हळद खेळण्यात गुंग झाल्या... एक मेकींच्या तोंडाला हळद फासता फासता हळदीचे गोळे तोंडात ही कोंबत होत्या.. फक्त पिवळ्या रंगाची रंगपंचमीच चालू होती..
लोक नटून थटून लग्नात येतात, चेहर्यावर महागडी सौंदर्य प्रसाधने लावून अश्या प्रकारे हळदी माखण्यासाठी येतात का हा वेगळाच प्रश्न..
आता नवरा नवरीला हळदी काढण्यासाठी म्हणजे अंघोळीसाठी घेऊन जाण्यात आले..
आणि इकडे हळदीच्या पंगती पडण्यात आल्या..
(आजूनही बर्याच ठिकाणी दुपारी हळद व हळदीचे जेवण आणि संध्याकाळी लग्न व लग्नाचं जेवण ही पद्धत आहे)
तिकडे नवरा-नवरीचे मामा आपल्या भाच्यांना घासून पुसून आंघोळ घालत होते..
आणि वर्हाडी मंडळी जेवणाचा अस्वाद घेत होती..
कोणी म्हणत होते भात आनं, कोणी भाजी, तर कोणी भजी, मठ्ठा, जिलेबी मागवत होते.. नुसता लग्न गोंधळ चालू होता..
काही ओळखीचे काही चेहरे नजरेस पडले होते, काही मित्र ही होते.. त्यांना सोबत घेऊन जेवणासाठी घाई केली.. (म्हणजे संध्याकाळी अक्षदा टाकताच परतीच्या गाडीत बसता येईल, जेवताना पाहीलं एक मुलगी सारखी टवकारून माझ्याकडे पाहत होती.. मीच शरमेने मान खाली घालून जेवलो..)
नवरदेवाची आंघोळ उरकली होती, आता मुलाला तयार करण्यासाठी चार पाच मुलं मुली त्याच्या भोवती थांबली होती.. काही जण फेटा, काही जण मुंडावळ्या, मळवट, मेकअप, किरीट यांच्या मागे लागले होती.. जो तो आपोआपले काम नियोजन बद्ध पद्धतीने करत होते.. मुलाची नुसती हेळसांड चालू होती.. कोण म्हणतयं इकड बघ.. कोण म्हणतयं तिकडं बघ.. कोण म्हणतयं आमूक करं.. तमूक करं..
बिचार्या सुहासला फोटोग्राफर, मेकप वाल्यांनी, वेशभूषा वाल्यांनी, वयोवृद्ध लोकांनी, रीती रिवाजांनी नुसतं पिडलं होतं.. लग्नापर्यंत उपवास असल्याने खिचडी पोहचली आणि त्यानं ती गट्मं केली..
आणि नवरदेव वाजत गाजत श्रीवंदनाच्या पूजेला निघून गेला.. पुजा आटपली.. आणि घोड्यावरून नवरदेवाची वरात वाजत गाजत.. लग्न मंडपाकडे निघाली आमच्या सारखे हवसे नवसे मनाला येईल तसं वेड वाकडं वरातीत नाचू लागले... वरात मंडपाजवळ आली होती... आम्ही नाचण्यात गुंग होतो.. जरा बाजूला नजर गेली तर ती मघाचशी मुलगी पुन्हा टवकारून पाहतचं होती.. (च्या मारी हा काय नवा वैताग... आधीचं मिटता मिटता नाकी नवं आलयं.. मनात पुटपुटलो)
.
क्रमशः
_____मनोज भिलारे

No comments:
Post a Comment