(जस्ट इमॅजीन)
श्रीवंदनानंतर सुहास मंडपात पोहचला त्या आधीच भटजी माईकवर ठरलेली वाक्य सारवतचं होता...
"मुला मुलीचे मामा नवरा नवरीला मंडपात घेऊन यायचं आहे.... मुहूर्ताची वेळ सरून चालली आहे.. "
एकतर आयुष्यात एकदाच लग्न आणि त्यालाही सर्वांची नुसती घाई...
मग सुहास व मुलीकडून काही विधी आटपून त्यांना लग्नासाठी उभे करून मध्ये अंतरपाट धरण्यात आला.. जरा बाजूला कोणीतरी उभारण्याचा धक्का लागला.. पाहीलं तरं ती मघाशीच मुलगी.. एकटक माझ्याकडे पाहत बोलली हाय... आय एम मंजूषा .........., मंजूषा गायकवाड
मी : हाय, मांडवाकडे खूणवत लग्न चालू झालयं...
काही वेळातच तिचं लक्ष अक्षदा टाकण्यात स्थिर झाल्याचे माझ्या लक्षात आले.. मी जागा बदलण्यासाठी सरकत सरकत दूर जाऊन थांबलो..
तिचं लक्ष चुकवता चुकवता लग्न आटपून झालं..
आता जाणारे जाण्याची आणि खाणारे खाण्याची घाई करू लागले.... नव्या जोडप्याला भेटणाऱ्यांची रीघ 15-20 मिनिटांत कमी झाली.. संध्याकाळचे 5.30 वाजले होते.. आता आपणही निघण्याची घाई करू म्हटलं.. या वरदळीत गर्दीत सुहासला जवळून भेटलोही नव्हतो... त्या जोडप्याजवळ जाऊन गिफ्ट हातात दिली..
सुहास : अरे वहिनींना का आणलं नाहीस.. एकटाच आलासं
मी: यावर नंतर बोलू पहिल्यांदा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. तुमचा संसार सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा होवो हीच शुभकामना.. ये मित्रा निघतो उशीर होतोय.. उद्या सुट्टी नाही मिळाली नाहीतर थांबलो असतो.. (तो बांधील आग्रह करण्याआधी मी माझ्या ओळी फेकून मोकळा झालो)
सुहास : अरे थांब, जास्त वेळ नाही, ओळख तरी करून घे ही माझी पत्नी अनघा आणि हा माझा बालमित्र मनोज भिलारे..
तेवढ्यात मागून एक आवाज आला.. आय्या मनोज भिलारे खरचं... पाहीलं तर ती मघाशीच मुलगी.. मी सुहास ला डिवचलं
.
.
क्रमशः
____मनोज भिलारे

No comments:
Post a Comment