(जस्ट इमॅजीन)
मी : ठीक आहे, पाहूया उद्या..
ती : ओके बाय, उद्या फोन करते.. आता.. ठेवते.. फोन
(एव्हाना बोलत बोलत घराजवळ आलो होतो, घरी येऊन फ्रेश होऊन चहा वगैरे घेतला.. काही वेळाने जेवण करून कालच्या लग्नातल्या काही सांगण्याजोग्या किस्स्यांबाबत सौंशी गप्पा मारता मारता झोपी गेलो.. सकाळी उठलो नेहमी प्रमाणे आवरले)
अॉफीसला निघता निघता सौंना सांगितले, संध्याकाळी यायला भौतेक वेळ होईल, परवाच्या सुट्टीचे काम राखून ठेवलय अॉफीसवाल्यांनी
(कारण ती महामाया अक्षदा पिच्छा सोडायची नाही किंवा नाही भेटलोतर चुकून पत्ता काढून घरी यायची)
(रोजनिशी प्रमाणे अॉफीसात काम चालू होते आणि चिंगम चगळल्याप्रमाणे मन आणि मेंदू अक्षदाचा विषय चगळत होते...
चार तासांच्या चाटींगमध्ये एकमेकांच्या जवळ आलो काय....
दोन दिवसांत भिषण युद्ध झालं काय...
"घरं का ना घाट का " अशी स्थिती झाली काय...
कसं बसं सावरत, वाईट स्वप्न समजून विसरलो काय..
आजून जखमा पुरत्या भरल्या नव्हत्या तर ही खपल्या काढायला हजर.. आता खपल्या काढत्या की मलम लाऊन जाते.. हे देवच जाणे...)
विचारात दिवस डूबला, 5.10 झाले असतील, फोन वाजला कालचाच नंबर दिसत होता, फोन उचलायचा की नाही हा भयंकर मोठा प्रश्न होता.. एकदाची किचकिच मिटवू या हिशोबाने फोन उचलला..
ती : हॅलो, अक्षदा
मी : हुं
ती : 6.15 ते 6.30 पर्यंत येशील का
मी : हुं
ती : हॉटेल 'सिटी गेस्ट', फॅमिली रूम, टेबल नंबर 3,
(सगळं आखणी (प्लॅन) करून बोलल्या सारखी बोलत होती आणि मी मात्र..)
मी : हुं
(6 वाजण्याच्या आधीच टेबल गुंडाळून बरोबर 6 वाजता अॉफीसमधून बाहेर पडलो आणि आणि थेट हॉटेल सिटी गेस्ट गाठलं)
.
___मनोज भिलारे

No comments:
Post a Comment