Tuesday, October 3, 2017

PART 30 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)



(जस्ट इमॅजीन)


सकाळ झाली नेहमी आवरलं आणि अॉफीसात पोहचलो रुटीन काम चालू झालं..  6 वाजले बिस्तारा आवरून अॉफीस मधून बाहेर पडलो..
तेवढ्यात एक फोन आला.. पुन्हा अनोळखी नंबर होता...  मी तर जाम वैतागलोय लोकांच्या या सारखा नंबर बदलण्याच्या पद्धतीला...  (फोन नंबर कधी पाहिलाय किंवा ऐकलाय का ते आठवत होतो..
काल ज्या मुलीला दिला तिचा तर नसेल ना...  पुन्हा हात धुवून माग लागायची बया.. तो ही नंबर आहे असं वाटतं नव्हता, कारण मिस्कॉल मध्ये तो नंबर पाहीला होता)
पुन्हा वेळ  न घालवता फोन उचलला, हॅलो....
तिकडून प्रतिसाद आला..  हॅलो..  तो ही मुलीच्या आवाजात....
(खरच कालची मुलगी हात धुवून मागे लागली आहे..  असं आवाजावरून तरी वाटलं..)
मी : हा बोला कोण बोलतय
ती : नमस्कार कवी साहेब, मी...
..
.
मी अक्षदा..
(माझ्यातर डोक्यात जाळच झाला, नाही नाही बॉम्बस्फोटच झाला)
मी : आजून काही पान उतारा करायचा राहिलाय का???
ती : नाही, नाही
मी : मग कशासाठी फोन केलास..  काय कारण??
ती : फक्त स्वारी म्हणण्यासाठी फोन केला, त्या  दिवशी रागाच्या भरात नको ते बोलले..  स्वारी हा.. मला क्षमा कर..  चूक माझीच होती सगळी...
.
(मी विचारात पडलो, हिला नंबर कोठून मिळाला कारण ज्या दिवशी मेसेज मध्ये तोंडभरून कौतुक केलं गेलं त्याच दिवशी मी फेसबुकवरचा नंबर डिलीट केला होता.. कारण मला पुन्हा फोनवर समोपचार नको होता)
मी : ओके ठिक आहे, माफ केल, ठेवतो फोन..
ती : तू माफ नाही केलस, म्हणून तुला बोलायचं ही नाही आहे..
मी : तसं काही नाही, घरी निघालोय उशीर होतोय ना म्हणून..
ती : हो का..  मग जाता जाता बोलं
मी : पण तुला माझा नंबर कोठून मिळाला....?
ती : काल तू पुण्यात होतास..
मी : बरोबर आहे मग
ती : तूला एक मुलगी भेटली होती कालं.. मंजुषा
(ही नवीन झंगाट महागात पडणार असं दिसत होतं)
मी : बरं मगं
ती : मीही काल लग्नासाठी आले होते..
मी : मग दिसली नाहीस कुठे
ती : गाडीत बसले होते आणि माझी मैत्रिण मंजुषा आली होती ना..
(डोक्यात घंटा वाजली.... , मंजुषा इतकी फोन नंबरच्या का मागे लागली होती)
मी : का,  तू का नाही आलीस??
ती : तुझ्या आनंदावर विर्जन नको म्हटलं आणि गाडीतच बसून राहिले..
ते सुहास त्यांना डिझाईन्स आम्हीच पुरवतो..
मी : धन्यवाद, आजून ही माझ्या आनंदाची काळजी करतेस म्हणून.. बरं आता ठेवतो.. बाय
ती : ए ऐक ना,
मी  : काय आता
ती : उद्या आपण भेटूयात, फक्त एकदाच..
प्लीज नाही म्हणू नको....
मी : कसं शक्य आहे... तू तिथे.. मी इथे..
ती : मी गाडीतच आहे साधारण तासाभरात पोहचतेय सांगलीत, सुहासने राहण्याची सोय केली आहे
.
(मी थोडी टाळाटाळ करत)
मी : आणि उद्या अॉफीस वगैरे, भौतेक नाही जमणार गं..
ती : अॉफीस संपल्यावर भेटू, आता आढे वेढे नको घेऊस.. प्लीज...  एकदाच भेटूयात ना..  तू माझ्याशी लग्न करं अथवा नको करू पण तूला एकदा पहायचं आहे प्लीज भेट
.
.
क्रमशः

_____मनोज भिलारे

No comments:

Post a Comment