(जस्ट इमॅजीन)
मी कंन्डक्टरचे आभार व्यक्त करून खाली उतरलो..
धो धो पाऊस पडत होता.. गारठल्याने अंगावर काटा येत होता.. अडोश्याला जाऊन मोबाईल काढला वेळ पाहीली रात्रीचे 1.30 वाजले होते.. आता घरी जाण्यासाठी अॅटो रिक्षा वापरावी लागणार.. म्हणून समोरच्या रिक्षास्टाफ वर भाड्याची चौकशी केली..
एकाने 300 तर दुसर्याने 350 रुपये सांगितले.. थोडी हुज्जत घातली... दिवसा शेअरिंग रिक्षा 10 आणि खाजगी 50 रूपये, आणि आता तेच 300-350 रूपये..
एकानं सांगितले रात्रीचे दर वेगळे असतात, आणि परतीला रिकामच यावं लागतं..
कोणी काही कमी करण्यासाठी तयारच नव्हते..
(मनातच च्या मारी पुण्यातून येण्यासाठी देखील एवढं तिकीट नव्हतं.. तेवढं या 5-6 किमी. साठी आहे.. भावाला बोलवूयात घेऊन जाण्यासाठी)
मग बंधूंना 2-3 वेळेस फोन केला.. त्यानंतर सौंना 2-3 वेळेस फोन केला पण कोणी फोनही उचलेना.. बहुतेक सगळेच डाराडूर गाढ झोपले होते..
(आता विचार केला रात्र स्टँडवर काढावी लागते म्हटलं पण पावसाच्या गारठ्यात काही खरं नव्हतं, मग रात्रकिड्यांची आठवण झाली.. पुन्हा आता फोन केला मित्राला म्हणजे संजयला...लगेच त्याने उचलला ही)
मी : हॅलो, देवा झोपलास की काय..
तो : नाही आजून, क्या बात है आज रातको फोन किया मन्या..
मी : स्टँडवर ये न्ह्यायला
तो : आत्ता नाही बाबा, पाऊस येतोया
मी : अरे, पोहे खायला ये रे
(होय नाही करत अखेर तो आला, रेटून पोहे खाल्ले, चहा घेतला आणि घरी पोहचता पोहचता हकिकत सांगितली)
पुरता पावसात भिजलो होतो, थंडीनं कापत कापत दार उघडण्यासाठी आवाज दिला..
आईने दार उघडले.. आणि एकदाचा घरी पोहोचलो...
फ्रेश झालो, कपडे बदलले..
स्वयंपाक खोलीत गेलो.. मस्तपैकी कमी साखरेचा स्ट्राँग चहा केला..
थंडीला चहात निपटाऊन झोपी गेलो...
.
क्रमशः
______मनोज भिलारे

No comments:
Post a Comment