Tuesday, October 3, 2017

PART 32 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)

(जस्ट इमॅजीन)


फॅमिली रुम मधे जाऊन टेबल नंबर 3 पाहीला..  आणि पाहतच राहीलो... अक्षदा आधीच वाट पहात बसली होती...
जेवढा तिचा फोटो सुंदर होता त्या पेक्षा ही खूप खूप सुंदर होती..
बोलके डोळे, छोटसं सरळ नाक,
कानात मोठ्या रिंगा, कोरीव ओठ,
सडपातळ बांधा, गुलाबी ड्रेस,
गुटगुटीत गाल, रेशमी केस,
मोकळ्या केसांनी पुन्हा वेढ लावलं होतं...
(मला पाहताच तिच्या चेहर्‍याचा रंग पलटला होता..
आता वाटलं उठून मुस्काटात फोडते की काय...
म्हणून गालावर हात फिरवत, दबकत, घाबरतं..  टेबल जवळ आलो)

ती : बस ना, उभा का??
( गालावर हात फिरवत बसलो समोरासमोर..)
ती :  (मेनूकार्ड सरकवत बोलली) काय खाणार..?
मी : कॉफी चालेल मला, बाकी काही नको...
ती : वेटर, दोन कॉफी
मी : दादा जरा स्ट्राँग आना...
ती : बोल,  काय म्हणतोस.. काय चाललंय
मी : काही नाही, सगळ मजेत नेहमी प्रमाणे,, आणि तू
ती : मीही मस्त, मजेत..  आणि कविता का थांबवल्यास रे
मी : काही नाही असचं, कामाच्या ओघात वेळ नसतो हल्ली, पण तू तर ब्लॉक केलयसं, मग कस बघतेस..
(तेवढ्यात कॉफी आली)
ती : (कपाच्या दांड्याला बोट लावून कप गोल फिरवत) तुझ नाव सर्च करते फेसबुकवर आणि पाहते..  पण जाम आवडतात तुझ्या कविता, एखाद्या दिवशी तुझी कविता वाचलीच नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटत.
मी : थँक्यू, बरं आता निघूयात का वेळ होतोय..
 (अक्षदा च्या मागे म्हणजे माझ्याकडे पाठ करून एक मुलगा एकटाच चहा घेत बसला होता, बहुतेक कोणाचीतरी वाट पहात असावा.  पण वळून वळून माझ्याकडे सारखा पहात होता..)
ती : थांब ना थोडा वेळ, मुल कीती आहेत..?
मी :  आजून काही नाहीत, जबाबदार्‍या असल्याने चान्स घेतला नाही..
ती : लग्न होऊन किती दिवस झालेत
मी : दोन वर्षे
ती : एक सांगू, तेही शांतपणे ऐकणार असशील तर
.
(सगळ निवळचं होतं आता चिढायचं काही कारणचं नव्हतं)
मी : हा, बोल
ती : तू बायकोला सोडचिठ्ठी दे,
मी : काय...?????
ती : हो तू डायव्होर्स दे, मी हवे तितके पैसे मी तिला देईन, आणि आपण दोघे लग्न करू..
मी : वेड लागलय का तुला, असं कसं करता येईल...
ती माझ्यावर विश्वास ठेवून अनोळखी घरात आई वडीलांना सोडून आली आहे...  तिच्या जागी तू आहेस.. आणि तुझ्या पेक्षा श्रीमंत मुलगी भेटली म्हणून मी तूला डायव्होर्स दिला तरं (लग्न होण्या आधीच मी अक्षताला डायव्होर्स देऊन टाकला)  आणि बायकोच माझ्यावर खूप प्रेम..  महत्वाचं म्हणजे माझही तिच्यावर खूप प्रेम आहे
(माझ बोलण चालू असताना तो मागचा मुलगा सारखा टवकारून माझ्याकडे पहातचं होता आणि बोलण संपेपर्यंत तिचा हात टेबलावरच्या फ्लॉवरपॉट जवळ गेला होता..  मी थोडा घाबरलोच म्हटलं आता डोक्यात घालते की काय..)
ती : बघ पुन्हा विचार कर, तुझं आयुष्य बदलू शकतं, सर्व जबाबदार्‍यांसाठी मी तयार आहे..  फक्त तुझी बायको सोडून.. तुला मिळेल सगळच गाडी, बंगला, नोकर-चाकर, हवं तसं वातावरण, शिवाय जॉब करण्याची गरज नाही...
मी : ते शक्य नाही..  स्वारी.. माझ्या मनाला पटत नाही..
(कॉफी संपवून बराच वेळ झाला होता)
ती : तुझ्यासाठी मी स्वतःला ही बदलू शकते
(बहुधा मला प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तिने वेटरला बोलावले आणि म्हणाली)
वेटर दादा दोन कॉफी आणि मघास सारख्या स्ट्राँग..
(वेटर अॉडर ऐकून निघून गेला)
दुसरा पर्याय आहे, माझ्याकडे...
मी : कशासाठी
.
.
क्रमशः
आता काय होईल?
अक्षदा कवीला मनवू शकेल?
कवी पत्नीला डायव्होर्स देईल..?
कवी लग्न करेल अक्षदाशी?
.

___मनोज भिलारे

No comments:

Post a Comment