Tuesday, October 3, 2017

PART 34 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)


(जस्ट इमॅजीन)


(स्वतःचं सुखी आयुष्य सोडून कोण या सर्किट मुलीशी लग्न करायचं,,, मी मुद्दाम तिरस्काराचा आव आणून तिच्या भावाशी बोलू लागलो)
मी : किती मुर्ख असतात ना या मुली..! कोणावरही कसा सहज विश्वास ठेवतात आणि स्वप्न रंगवत बसतात..  अशा कित्येक मुली चॅटिंग केल्या आणि गेल्या..  आणि मी प्रत्येकेशी लग्न करत बसलो तर झालचं..  मी फक्त फेसबुकवर टाईमपास करत असतो..
(आता तिच्याकडे पहात)
यांना दोन चार शब्द गोड बोलले, जरा रूपाचं गुणगान केलं की चालू झाला टाईमपास..  यांच्यासारख्या छप्पनं भेटतात रोज..
(अक्षदा शांत होती पण तिच्या डोळ्यातून अश्रूधारा थांबून डोळे आग ओकत होते, आणि अमित ही खूप चिढला होता नाकातून येणारा नागाचा फुत्कार जाणवत होता, बहूतेक हॉटेल मध्ये तमाशा नको म्हणून तो शांत होता आणि मी आणखी भडकवत होतो)
कोण काय मला सांभाळणार..  मीच दोन - तीन संभाळून आहे..  असे गेले किती आणि आले किती आपल्याला फरक नाही पडत.. कोणी गेलं म्हणून काही थांबत नाही..  उलट नवीन काहीतरी चांगलं भेटतं..
अक्षदाने जागेवरून माझ्या मुस्काटात जोरात ठेवून दिली..  कानात सारा आवाज किरंरंरं झाला..
अमितने तिला आवरत बोलला मी बघतो नंतर याला तू चलं...  आणि तिला सावरत तिला घेऊन गेला..  तीही लंगडत लंगडत त्याच्या आधाराने निघून गेली.. बाकीचे माझ्याकडे अपराध्याच्या भावनेने पहात होते.. मला वाटलं हे ही उठून हात साफ करून घेतायत की काय..
तेवढ्यात वेटर आला..  साहेब आणखी काय..
मी : (गालावर हात ठेवूनच)  काही नको, पोट भरलं
वेटर : साहेब, बिल आणू
मी : आण
(पाचेक मिनिटात तो बिल आणि आईस्क्रीम घेऊन परतला 945 रूपये,)
मी  : एवढे कशाचे लावलेस रे..
वेटर : तुमच्या सोबत जे साहेब आणि मॅडम होत्या..  ते दुपारी 3 वाजल्यापासून हितच होते..  त्यांच दुपारच जेवण, कोल्ड्रींक, संध्याकाळी चहा नाष्टा, आणि तुम्ही आल्यापासून चहा कॉफीच बिलं आहे हे.. आणि सोबत कॉम्प्लेमेंट्री म्हणून हॉटेल कडून आपल्याला आईस्क्रीम कप..

मी : अरे बाबा हे आईस्क्रीम घेऊन जा आणि त्या ऐवजी फक्त थोडा बर्फ घेऊन ये..
(थोडा गालाला लावता येईल आणि उरलेला डोक्यावर ठेवता येईल..  तोंडातचं पुटपुटलो..)
त्या बिचार्‍याने बर्फ आणला..  मी बिल पेड केले आणि गालाला बर्फ लावत बाहेर पडलो.. ते निघून गेले होते..
 हे प्रकरण काही चूक न करताच खूप महागात पडले होते.. नऊशे पंचेचाळीस रुपये आणि जोरदार मुस्काटात..
घरी आलो फ्रेश झालो जेवलो आणि झोपी गेलो..
पुढच्या चारेक दिवसांनी सुहास नव्या नवरीला घेऊन देवाला आणि सर्वांना नमस्कार करण्यासाठी सांगलीत आला... दुसर्‍या दिवशी फोनवर बोललो त्या प्रमाणे संध्याकाळी नदीच्या घाटावर भेटलो..  मी काही बोलण्याच्या आधीच
सुहास : हे तू काही बरोबर केलं नाहीसं, कोणाला फसवावं हे ही कळत नाही..  आणि तूला हे नसते धंदे हवेतच कशाला..  किती लोकांना फसवलं आहेस.. मी तुला खूप चांगला समजत होतो..
मी : माझं थोड ऐकून तर घे
सुहास : काय शिल्लक ठेवलयसं आता ऐकायला..  मला सगळ सांगितलय अमित साहेबांनी.. मला खूप लाज वाटते आहे तूला मित्र म्हणताना
मी : आधी ऐकून घे..  मग तू म्हणशील ते खरं..
फेसबूकवरचे पुरावे दाखवत पुर्ण कहाणी रिवाइंड करून सांगितली..  आणि शेवटी हॉटेल मधे असा का वागलो तेही सांगितले..
मी : मी जर असा वागलो नसतो तर, ती हट्टी मुलगी ऐकली नसती..  आणि तिचं ऐकण्यात कोणाचचं भलं नव्हतं.. माझी ही थोडी चूक झाली..  स्वारी खूप घोडचूक झाली..  मी आधीच सांगितले असतं मी विवाहीत आहे.. तर हा प्रकार घडलाच नसता..
(पाच-सहा महिने उलटले असतील..  एका अनोळखी नंबर वरून फोन.. अरे काय हे जगातले कोणाचाच नंबर माझ्याकडे सेव्ह नाही..  सारखे अनोळखी नंबरचे फोन येतात..  फोन उचलला)
मी : हॅलो, कोण बोलतयं
तो : नमस्कार सर, मी अमित बोलतोय.. अक्षदाचा भाऊ..
मी : (अरेच्चा हा काय नवा फंदा) हुं, नमस्कार
अमित : स्वारी सर..  मी तुमच्याशी काही चुकीचं वागलो असेल तर..मी तुम्हाला ओळखू शकलो नाही.. बहिणीच्या प्रेमात वेढा झालो होतो.. आणि खूप खूप धन्यवाद..  माझ्या बहिणीला योग्य प्रकारे समजवल्याबद्दल..  तिनं आमचं कोणाचं ऐकलचं नसतं.. हे मला सुहासनं सांगितलं.. तिचं लग्न ठरलयं मुलगा डॉक्टर आहे..  महत्वाचं म्हटलं तर तो कवी आहे..
पण तुमच्या कविता काही औरचं, मजा येते वाचायला... आता मीही वाचतो नेहमी तुमच्या कविता..  अगदी प्रेमातच पडलोय..
तुमच्या कवितांच्या...
मी : (भारावून) थँक्यू थँक्यू
तो : भेटू लवकरचं
मी : बहुतेक आता शक्य नाही..  कारण मी सिंगापूरला असतो.. सुट्टीला आलो होतो.. (असचं फेकून दिलं कारण भेटण्याचं टाळायचं होतं)
अच्छा बाय बाय
तो : लिहीत रहा, छान छान लिहीत रहा, बेस्ट लक..
बाय बाय..
(त्या दिवशीच मी मोबाईल मधून सिमकार्ड काढून टाकून दिलं आणि नवीन नंबर घेतला तोही कोणाला न देण्यासाठी.. हल्ली कोणाशीही चॅट करण टाळतो आणि अनोळखी नंबरचे फोन उचलत नाही...... )
.
.

🙏 नमस्कार 🙏  धन्यवाद..!
 
............ समाप्त............ 

PART 33 ( तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)

(जस्ट इमॅजीन)



ती : तुझ्या जवळ येण्याचा पर्याय आहे..  माझ्याकडे
.
(माझ्या मनात..आलं... .  हिच्या मनात एखादा खुन वगैरे तरं नाही ना चाललं)
मी : काय..??
(ती थोड थांबून)
ती : घे कॉफी घे,,,
मी : हां
ती : तुझ्या पत्नीसह, तुझ्या अडचणींसह मी तुला आपलं करायला तयार आहे.. तुझ्याशी लग्न करायला तयार आहे... फक्त तुला कायमचं पुण्यात याव लागेल...
मी : ते कसं शक्य आहे???
ती : तु कॉफी घेतलीस का थंड होईल
मी : हां
ती : तु जश्या दोन कॉफ्या पचवल्यास ना, तश्या दोन बायका ही पचवू शकतोस..
(अरे यार कसलं, काय उदाहरण दिलं हिने..
च्या मारी हिने ही दोन कॉफी पिल्या मग...... ही पण... पण तोंडात आलेले शब्द गिळले..)
(तो मागचा मुलगा, आ वासून माझ्याकडे पहात होता)
मी : आता मी सांगतोय ते निट ऐक
तुला माझ्या कविता खूप आवडतात, बरोबर
ती : हो
मी : तुझी माझी मैत्री अशीच राहू दे, तुला फेसबुकवर माझ्या आणि माझ्यापेक्षा जास्त सरस लोकांच्या कविता वाचायला मिळतील..आणि तू खूपच सुंदर आहेस त्यामुळे माझ्यापेक्षा सुंदर आणि हुशार जोडीदार मिळेल, तू आपल्या लग्नाचा विचार मनातून तू काढून टाक..  आपण चांगले मित्र म्हणून राहू शकतो.. (मला पुन्हा विशाची परीक्षा घ्यायची नसल्याने मी बोलून मोकळा झालो)
(तीच्या डोळ्यातून पाण्याच्या सरी कोसळत होत्या.. ती भरल्या कंठाने बोलत होती)
ती : तुझ्या मनात असा विचार तरी कसा आला, मी दुसर्‍याशी लग्न करेन, आणि तुझ्याशिवाय जगू शकेन.
मी : असं अभद्र बोलू नकोस..  जिवन खूप सुंदर आहे.. आणि सुंदर लोकांनी सुंदरच विचार करायचा असतो..
(मागे बसलेला मुलगा आता उठला, आणि अक्षदा च्या शेजारी बसला.. मी अश्चर्याने त्याच्याकडे पहात होतो..  अक्षदा धुमसत हुंदके देत होती)
तो : मी अमित..  अक्षदा च्या सर्वात जवळचा मित्र आणि मोठा भाऊ..
(मला आणखी एक धक्का बसला, आता फक्त हार्ट फेल व्हायच बाकी होतं)
अरे मित्रा ही माझी बहिण खूप लाडात वाढलेली आहे.. तिला घरी कोणी काही बोलत नाहीत..  तिचा खूप लाड करतात अगदी मीही... तिच्या हट्टापायी मी इथपर्यंत आलो आहे...  तु प्लीज नाही म्हणू नको..  तूला काहीही कमी पडू देणार नाही.. जेव्हा तूला ती मेसेज मध्ये काही बाई बोलली तेव्हा ती खूप रडली.. दोन दिवस कोणाशीही काही बोलली नाही.. अगदी माझ्याशी ही..  आणि नंतर तिने साइट वर बांधकाम चालू असलेल्या इमारतीवरून अचानक खाली उडी मारली..  त्यामुळे तिच्या पायाला इजा झाली.. अॉपरेशन मध्ये सळ्या घातल्या गेल्या.. अजूनही प्लॅस्टर आहे पायाला तू पाहू शकतोस, ही तुमच्या लेखनातील कथा नाही,,,, आणि ती शुद्धीवर आली तेव्हा खूप रडू लागली आणि तिने पुढची सर्व हकिकत सांगितली.. आणि सारख म्हणत होती "त्याच्याशिवाय जगायचं नाही मला"... पण मला काहीच सुचत नव्हतं.. वाटलं दोन मुस्काटात ठेवून द्याव्यात... पण मी तसं काही केलं नाही..  खूप समजवलं तुझ्यापेक्षा सरस मुलगा आणून देतो..  पुन्हा असले फालतू विचार मनात आणू नकोस..
तीची ऐकून घेण्याची मनःस्थिती दाखवेना.. मग मी म्हणालो आधी बरी हो मग बोलून घेतो त्याच्याशी..
आणि तुझ लग्न लावून देतो.. तीने उडी मारली हे घरी न सांगता,  पाय घसरून पडली असचं सांगितलं आहे.. मी तिला वारंवार सारखा समजावण्याचा प्रयत्न करतोय पण आजून ही ऐकत नाही..  प्लीज तू तरी हट्ट सोड आणि तिच्याशी लग्न करं..
(म्हणतात ना प्यार में सब अंधे हो जाते है..  आणि दिल गधेपर आया तो परी क्या चिज है..)

क्रमशः

___मनोज भिलारे

PART 32 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)

(जस्ट इमॅजीन)


फॅमिली रुम मधे जाऊन टेबल नंबर 3 पाहीला..  आणि पाहतच राहीलो... अक्षदा आधीच वाट पहात बसली होती...
जेवढा तिचा फोटो सुंदर होता त्या पेक्षा ही खूप खूप सुंदर होती..
बोलके डोळे, छोटसं सरळ नाक,
कानात मोठ्या रिंगा, कोरीव ओठ,
सडपातळ बांधा, गुलाबी ड्रेस,
गुटगुटीत गाल, रेशमी केस,
मोकळ्या केसांनी पुन्हा वेढ लावलं होतं...
(मला पाहताच तिच्या चेहर्‍याचा रंग पलटला होता..
आता वाटलं उठून मुस्काटात फोडते की काय...
म्हणून गालावर हात फिरवत, दबकत, घाबरतं..  टेबल जवळ आलो)

ती : बस ना, उभा का??
( गालावर हात फिरवत बसलो समोरासमोर..)
ती :  (मेनूकार्ड सरकवत बोलली) काय खाणार..?
मी : कॉफी चालेल मला, बाकी काही नको...
ती : वेटर, दोन कॉफी
मी : दादा जरा स्ट्राँग आना...
ती : बोल,  काय म्हणतोस.. काय चाललंय
मी : काही नाही, सगळ मजेत नेहमी प्रमाणे,, आणि तू
ती : मीही मस्त, मजेत..  आणि कविता का थांबवल्यास रे
मी : काही नाही असचं, कामाच्या ओघात वेळ नसतो हल्ली, पण तू तर ब्लॉक केलयसं, मग कस बघतेस..
(तेवढ्यात कॉफी आली)
ती : (कपाच्या दांड्याला बोट लावून कप गोल फिरवत) तुझ नाव सर्च करते फेसबुकवर आणि पाहते..  पण जाम आवडतात तुझ्या कविता, एखाद्या दिवशी तुझी कविता वाचलीच नाही तर चुकल्या चुकल्या सारखं वाटत.
मी : थँक्यू, बरं आता निघूयात का वेळ होतोय..
 (अक्षदा च्या मागे म्हणजे माझ्याकडे पाठ करून एक मुलगा एकटाच चहा घेत बसला होता, बहुतेक कोणाचीतरी वाट पहात असावा.  पण वळून वळून माझ्याकडे सारखा पहात होता..)
ती : थांब ना थोडा वेळ, मुल कीती आहेत..?
मी :  आजून काही नाहीत, जबाबदार्‍या असल्याने चान्स घेतला नाही..
ती : लग्न होऊन किती दिवस झालेत
मी : दोन वर्षे
ती : एक सांगू, तेही शांतपणे ऐकणार असशील तर
.
(सगळ निवळचं होतं आता चिढायचं काही कारणचं नव्हतं)
मी : हा, बोल
ती : तू बायकोला सोडचिठ्ठी दे,
मी : काय...?????
ती : हो तू डायव्होर्स दे, मी हवे तितके पैसे मी तिला देईन, आणि आपण दोघे लग्न करू..
मी : वेड लागलय का तुला, असं कसं करता येईल...
ती माझ्यावर विश्वास ठेवून अनोळखी घरात आई वडीलांना सोडून आली आहे...  तिच्या जागी तू आहेस.. आणि तुझ्या पेक्षा श्रीमंत मुलगी भेटली म्हणून मी तूला डायव्होर्स दिला तरं (लग्न होण्या आधीच मी अक्षताला डायव्होर्स देऊन टाकला)  आणि बायकोच माझ्यावर खूप प्रेम..  महत्वाचं म्हणजे माझही तिच्यावर खूप प्रेम आहे
(माझ बोलण चालू असताना तो मागचा मुलगा सारखा टवकारून माझ्याकडे पहातचं होता आणि बोलण संपेपर्यंत तिचा हात टेबलावरच्या फ्लॉवरपॉट जवळ गेला होता..  मी थोडा घाबरलोच म्हटलं आता डोक्यात घालते की काय..)
ती : बघ पुन्हा विचार कर, तुझं आयुष्य बदलू शकतं, सर्व जबाबदार्‍यांसाठी मी तयार आहे..  फक्त तुझी बायको सोडून.. तुला मिळेल सगळच गाडी, बंगला, नोकर-चाकर, हवं तसं वातावरण, शिवाय जॉब करण्याची गरज नाही...
मी : ते शक्य नाही..  स्वारी.. माझ्या मनाला पटत नाही..
(कॉफी संपवून बराच वेळ झाला होता)
ती : तुझ्यासाठी मी स्वतःला ही बदलू शकते
(बहुधा मला प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी तिने वेटरला बोलावले आणि म्हणाली)
वेटर दादा दोन कॉफी आणि मघास सारख्या स्ट्राँग..
(वेटर अॉडर ऐकून निघून गेला)
दुसरा पर्याय आहे, माझ्याकडे...
मी : कशासाठी
.
.
क्रमशः
आता काय होईल?
अक्षदा कवीला मनवू शकेल?
कवी पत्नीला डायव्होर्स देईल..?
कवी लग्न करेल अक्षदाशी?
.

___मनोज भिलारे

PART 31 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी. ?)



(जस्ट इमॅजीन)



मी  : ठीक आहे, पाहूया उद्या..
ती : ओके बाय, उद्या फोन करते.. आता.. ठेवते..  फोन
(एव्हाना बोलत बोलत घराजवळ आलो होतो, घरी येऊन फ्रेश होऊन चहा वगैरे घेतला..  काही वेळाने जेवण करून कालच्या लग्नातल्या काही सांगण्याजोग्या किस्स्यांबाबत सौंशी गप्पा मारता मारता झोपी गेलो.. सकाळी उठलो नेहमी प्रमाणे आवरले)
अॉफीसला निघता निघता सौंना सांगितले, संध्याकाळी यायला भौतेक वेळ होईल, परवाच्या सुट्टीचे काम राखून ठेवलय अॉफीसवाल्यांनी
(कारण ती महामाया अक्षदा पिच्छा सोडायची नाही किंवा नाही भेटलोतर चुकून पत्ता काढून घरी यायची)
(रोजनिशी प्रमाणे अॉफीसात काम चालू होते आणि चिंगम चगळल्याप्रमाणे मन आणि मेंदू अक्षदाचा विषय चगळत होते...
चार तासांच्या चाटींगमध्ये एकमेकांच्या जवळ आलो काय....
दोन दिवसांत भिषण युद्ध झालं काय...
"घरं का ना घाट का " अशी स्थिती झाली काय...
कसं बसं सावरत, वाईट स्वप्न समजून विसरलो काय..
आजून जखमा पुरत्या भरल्या नव्हत्या तर ही खपल्या काढायला हजर..  आता खपल्या काढत्या की मलम लाऊन जाते..  हे देवच जाणे...)

 विचारात दिवस डूबला, 5.10 झाले असतील, फोन वाजला कालचाच नंबर दिसत होता, फोन उचलायचा की नाही हा भयंकर मोठा प्रश्न होता.. एकदाची किचकिच मिटवू या हिशोबाने फोन उचलला..
ती : हॅलो, अक्षदा
मी : हुं
ती : 6.15 ते 6.30 पर्यंत येशील का
मी : हुं
ती : हॉटेल 'सिटी गेस्ट', फॅमिली रूम, टेबल नंबर 3,
(सगळं आखणी (प्लॅन) करून बोलल्या सारखी बोलत होती आणि मी मात्र..)
मी : हुं
(6 वाजण्याच्या आधीच टेबल गुंडाळून बरोबर 6 वाजता अॉफीसमधून बाहेर पडलो आणि आणि थेट हॉटेल सिटी गेस्ट गाठलं)
.

___मनोज भिलारे

PART 30 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)



(जस्ट इमॅजीन)


सकाळ झाली नेहमी आवरलं आणि अॉफीसात पोहचलो रुटीन काम चालू झालं..  6 वाजले बिस्तारा आवरून अॉफीस मधून बाहेर पडलो..
तेवढ्यात एक फोन आला.. पुन्हा अनोळखी नंबर होता...  मी तर जाम वैतागलोय लोकांच्या या सारखा नंबर बदलण्याच्या पद्धतीला...  (फोन नंबर कधी पाहिलाय किंवा ऐकलाय का ते आठवत होतो..
काल ज्या मुलीला दिला तिचा तर नसेल ना...  पुन्हा हात धुवून माग लागायची बया.. तो ही नंबर आहे असं वाटतं नव्हता, कारण मिस्कॉल मध्ये तो नंबर पाहीला होता)
पुन्हा वेळ  न घालवता फोन उचलला, हॅलो....
तिकडून प्रतिसाद आला..  हॅलो..  तो ही मुलीच्या आवाजात....
(खरच कालची मुलगी हात धुवून मागे लागली आहे..  असं आवाजावरून तरी वाटलं..)
मी : हा बोला कोण बोलतय
ती : नमस्कार कवी साहेब, मी...
..
.
मी अक्षदा..
(माझ्यातर डोक्यात जाळच झाला, नाही नाही बॉम्बस्फोटच झाला)
मी : आजून काही पान उतारा करायचा राहिलाय का???
ती : नाही, नाही
मी : मग कशासाठी फोन केलास..  काय कारण??
ती : फक्त स्वारी म्हणण्यासाठी फोन केला, त्या  दिवशी रागाच्या भरात नको ते बोलले..  स्वारी हा.. मला क्षमा कर..  चूक माझीच होती सगळी...
.
(मी विचारात पडलो, हिला नंबर कोठून मिळाला कारण ज्या दिवशी मेसेज मध्ये तोंडभरून कौतुक केलं गेलं त्याच दिवशी मी फेसबुकवरचा नंबर डिलीट केला होता.. कारण मला पुन्हा फोनवर समोपचार नको होता)
मी : ओके ठिक आहे, माफ केल, ठेवतो फोन..
ती : तू माफ नाही केलस, म्हणून तुला बोलायचं ही नाही आहे..
मी : तसं काही नाही, घरी निघालोय उशीर होतोय ना म्हणून..
ती : हो का..  मग जाता जाता बोलं
मी : पण तुला माझा नंबर कोठून मिळाला....?
ती : काल तू पुण्यात होतास..
मी : बरोबर आहे मग
ती : तूला एक मुलगी भेटली होती कालं.. मंजुषा
(ही नवीन झंगाट महागात पडणार असं दिसत होतं)
मी : बरं मगं
ती : मीही काल लग्नासाठी आले होते..
मी : मग दिसली नाहीस कुठे
ती : गाडीत बसले होते आणि माझी मैत्रिण मंजुषा आली होती ना..
(डोक्यात घंटा वाजली.... , मंजुषा इतकी फोन नंबरच्या का मागे लागली होती)
मी : का,  तू का नाही आलीस??
ती : तुझ्या आनंदावर विर्जन नको म्हटलं आणि गाडीतच बसून राहिले..
ते सुहास त्यांना डिझाईन्स आम्हीच पुरवतो..
मी : धन्यवाद, आजून ही माझ्या आनंदाची काळजी करतेस म्हणून.. बरं आता ठेवतो.. बाय
ती : ए ऐक ना,
मी  : काय आता
ती : उद्या आपण भेटूयात, फक्त एकदाच..
प्लीज नाही म्हणू नको....
मी : कसं शक्य आहे... तू तिथे.. मी इथे..
ती : मी गाडीतच आहे साधारण तासाभरात पोहचतेय सांगलीत, सुहासने राहण्याची सोय केली आहे
.
(मी थोडी टाळाटाळ करत)
मी : आणि उद्या अॉफीस वगैरे, भौतेक नाही जमणार गं..
ती : अॉफीस संपल्यावर भेटू, आता आढे वेढे नको घेऊस.. प्लीज...  एकदाच भेटूयात ना..  तू माझ्याशी लग्न करं अथवा नको करू पण तूला एकदा पहायचं आहे प्लीज भेट
.
.
क्रमशः

_____मनोज भिलारे

PART 29 ( तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)

(जस्ट इमॅजीन)





मी कंन्डक्टरचे आभार व्यक्त करून खाली उतरलो..
धो धो पाऊस पडत होता.. गारठल्याने अंगावर काटा येत होता..  अडोश्याला जाऊन मोबाईल काढला  वेळ पाहीली रात्रीचे 1.30 वाजले होते..  आता घरी जाण्यासाठी अॅटो रिक्षा वापरावी लागणार..  म्हणून समोरच्या रिक्षास्टाफ वर भाड्याची चौकशी केली..
एकाने 300 तर दुसर्‍याने 350 रुपये सांगितले.. थोडी हुज्जत घातली...  दिवसा शेअरिंग रिक्षा 10 आणि खाजगी 50 रूपये, आणि आता तेच 300-350 रूपये..
एकानं सांगितले रात्रीचे दर वेगळे असतात, आणि परतीला रिकामच यावं लागतं..
कोणी काही कमी करण्यासाठी तयारच नव्हते..
(मनातच च्या मारी पुण्यातून येण्यासाठी देखील एवढं तिकीट नव्हतं..  तेवढं या 5-6 किमी.  साठी आहे.. भावाला बोलवूयात घेऊन जाण्यासाठी)
मग बंधूंना 2-3 वेळेस फोन केला..  त्यानंतर सौंना 2-3  वेळेस फोन केला पण कोणी फोनही उचलेना..  बहुतेक सगळेच डाराडूर गाढ झोपले होते..
(आता विचार केला रात्र स्टँडवर काढावी लागते म्हटलं पण पावसाच्या गारठ्यात काही खरं नव्हतं, मग रात्रकिड्यांची आठवण झाली.. पुन्हा आता फोन केला मित्राला म्हणजे संजयला...लगेच त्याने उचलला ही)
मी : हॅलो, देवा झोपलास की काय..
तो : नाही आजून, क्या बात है आज रातको फोन किया मन्या..
मी : स्टँडवर ये न्ह्यायला
तो : आत्ता नाही बाबा, पाऊस येतोया
मी : अरे, पोहे खायला ये रे
(होय नाही करत अखेर तो आला, रेटून पोहे खाल्ले, चहा घेतला आणि घरी पोहचता पोहचता हकिकत सांगितली)
पुरता पावसात भिजलो होतो, थंडीनं कापत कापत दार उघडण्यासाठी आवाज दिला..
आईने दार उघडले.. आणि एकदाचा घरी पोहोचलो...
फ्रेश झालो, कपडे बदलले..
स्वयंपाक खोलीत गेलो..  मस्तपैकी कमी साखरेचा स्ट्राँग चहा केला..
थंडीला चहात निपटाऊन झोपी गेलो...
.
क्रमशः







______मनोज भिलारे

PART 28 ( तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.? )

(जस्ट इमॅजीन)





तेवढ्यात मागून एक आवाज आला..  आय्या मनोज भिलारे खरचं...  पाहीलं तर ती मघाशीच मुलगी.. मी सुहास ला डिवचलं
सुहास : हो हे मनोज भिलारे आणि या आमच्या पोजेक्टच्या ज्युनियर इंजनियरीन बाई मंजूषा गायकवाड,  (कॅमेरामन ला) एक फोटो घे रे..
(त्याने फोटो घेतला ते लोडनं शेजारी उभ होतं)
मी निघालो मागोमाग ती होतीच मी थांबलो आणि म्हणालो काय ते एकदाच सांगा बाई..
मंजुषा : एवढे वैतागू नका आणि बाई म्हणू नका..  माझ नाव मंजुषा आहे.. मी तुमच्या कविता वाचते खूप छान असतात.. खूप आवडतात
मी : स्वारी, थँक्स..
ती : मला तुमचा नंबर हवा आहे.. (स्वतःचा मोबाईल काढता काढता बोलली)
मी : 80-875-36-718 (वाळला नवीन डोक्याला ताप नको म्हणून चुकीचा नंबर देऊन निघालो)
ती: हा तर नंबर लागत नाही (लगेच तीने तपासून पाहीला होता, हुशारच)
मी : (मोबाईल काढता काढता) रेंज नसेल
ती : दुसरा द्या.
मी : 9822-170-105 (ही बया पाठ सोडेना म्हणून खरा नंबर देऊन टाकला..
ती: मिस्कॉल करते हां, हा माझा नंबर..
मी पुन्हा या सगळ्या प्रकाराचा विचार करत स्टँन्डवर पोहचलो..
एकतर मी एवढा प्रसिद्ध कधी न्हवतोच.. अय्या मनोज भिलारे खरचं....  यवढं म्हणण्या इतपतं तरी..
मधून मधून मागे पहातच होतो आणि बिचारी मागावर तर नाही ना हे पाहण्यासाठी..
आता जवळपास 7 वाजले होते...  चहा घेतला नी गाडी धरली.. तिकीट काढतानाच कंन्डक्टरला सांगली आल्यावर उठवण्याची विनंती केली..  गाडी थोडी रिकामीच होती.. कमीत कमी धक्के लागावेत या हिशोबाने मधली शिट पकडली..  कारण सकाळी लवकर उठल्याने खूप आळस आला होता..  झोप आलीतर सोय व्हावी म्हणून....
(रेल्वेच टाईम जुळत नाही आणि ट्रॅव्हल्सच बजेट जूळत नाही त्यामुळे मस्त मधला पर्याय एस्टी)
लाईटांचा झगमगाट पहात पुणे सोडले आता सारा काळोख आणि वाहनांचे उजेड दिसत होते मधून मधून रस्त्याशेजारचे विजेच्या खांबाची पंगत दिसत होती.  तसेच वस्त्यांच्या आलीकडं पलीकडं धाब्यांची रोषणाई पाहता पाहता डोळा कधी लागला गाडी कुठ कुठ थांबली काही कळालच नाही..  सांगलीत आल्यावर कंडक्टरनी हालवून जागं केलं..
.
.. क्रमशः





______मनोज भिलारे

PART 27 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)



(जस्ट इमॅजीन)



श्रीवंदनानंतर सुहास मंडपात पोहचला त्या आधीच भटजी माईकवर ठरलेली वाक्य सारवतचं होता...
"मुला मुलीचे मामा नवरा नवरीला मंडपात घेऊन यायचं आहे....  मुहूर्ताची वेळ सरून चालली आहे..  "
एकतर आयुष्यात एकदाच लग्न आणि त्यालाही सर्वांची नुसती घाई...
मग सुहास व मुलीकडून काही विधी आटपून त्यांना लग्नासाठी उभे करून मध्ये अंतरपाट धरण्यात आला..   जरा बाजूला कोणीतरी उभारण्याचा धक्का लागला..  पाहीलं तरं ती मघाशीच मुलगी..  एकटक माझ्याकडे पाहत बोलली हाय... आय एम मंजूषा .........., मंजूषा गायकवाड
मी : हाय, मांडवाकडे खूणवत लग्न चालू झालयं...
काही वेळातच तिचं लक्ष अक्षदा टाकण्यात स्थिर झाल्याचे माझ्या लक्षात आले.. मी जागा बदलण्यासाठी सरकत सरकत दूर जाऊन थांबलो..
तिचं लक्ष चुकवता चुकवता लग्न आटपून झालं..
आता जाणारे जाण्याची आणि खाणारे खाण्याची घाई करू लागले.... नव्या जोडप्याला भेटणाऱ्यांची रीघ 15-20 मिनिटांत कमी झाली..  संध्याकाळचे 5.30 वाजले होते..  आता आपणही निघण्याची घाई करू म्हटलं..  या वरदळीत गर्दीत सुहासला जवळून भेटलोही नव्हतो...  त्या जोडप्याजवळ जाऊन गिफ्ट हातात दिली..
सुहास : अरे वहिनींना का आणलं नाहीस..  एकटाच आलासं
मी: यावर नंतर बोलू पहिल्यांदा लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा.. तुमचा संसार सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा होवो हीच शुभकामना.. ये मित्रा निघतो उशीर होतोय..  उद्या सुट्टी नाही मिळाली नाहीतर थांबलो असतो.. (तो बांधील आग्रह करण्याआधी मी माझ्या ओळी फेकून मोकळा झालो)
सुहास : अरे थांब, जास्त वेळ नाही, ओळख तरी करून घे ही माझी पत्नी अनघा आणि हा माझा बालमित्र मनोज भिलारे..
तेवढ्यात मागून एक आवाज आला..  आय्या मनोज भिलारे खरचं...  पाहीलं तर ती मघाशीच मुलगी.. मी सुहास ला डिवचलं
.
.
क्रमशः



____मनोज भिलारे

PART 26 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)

(जस्ट इमॅजीन)




विचारत विचारत कार्यालयात पोहोचलो... आणि आलो आहे हे दाखविण्यासाठी सुहास समोर जात दुरूनच हात केला..  त्यानेही तत्काळ जागेवरून हात जोडून स्वागत केले,,  नुकतीच हळदी लागन चालू होती.. नवरा नवरीला हळदीची पाच पाच बोट उठवून आरती ओवाळून बायका जात होत्या. कंन्ट्रोलच्या (रेशनिंगच्या) दुकानात जशी बारी (रांग) लावतात तशी बायकांची रांग लागली होती..
नवरा नवरीला हळद लावताच ह्या परस्परांमध्ये हळद खेळण्यात गुंग झाल्या... एक मेकींच्या तोंडाला हळद फासता फासता हळदीचे गोळे तोंडात ही कोंबत होत्या.. फक्त पिवळ्या रंगाची रंगपंचमीच चालू होती..
लोक नटून थटून लग्नात येतात, चेहर्‍यावर महागडी सौंदर्य प्रसाधने लावून अश्या प्रकारे हळदी माखण्यासाठी येतात का हा वेगळाच प्रश्न..
आता नवरा नवरीला हळदी काढण्यासाठी म्हणजे अंघोळीसाठी घेऊन जाण्यात आले..
आणि इकडे हळदीच्या पंगती पडण्यात आल्या..
(आजूनही बर्‍याच ठिकाणी दुपारी हळद व हळदीचे जेवण आणि संध्याकाळी लग्न व लग्नाचं जेवण ही पद्धत आहे)
तिकडे नवरा-नवरीचे मामा आपल्या भाच्यांना घासून पुसून आंघोळ घालत होते..
आणि वर्‍हाडी मंडळी जेवणाचा अस्वाद घेत होती..
कोणी म्हणत होते भात आनं, कोणी भाजी, तर कोणी भजी, मठ्ठा, जिलेबी मागवत होते..  नुसता लग्न गोंधळ चालू होता..
काही ओळखीचे काही चेहरे नजरेस पडले होते, काही मित्र ही होते..  त्यांना सोबत घेऊन जेवणासाठी घाई केली..  (म्हणजे संध्याकाळी अक्षदा टाकताच परतीच्या गाडीत बसता येईल, जेवताना पाहीलं एक मुलगी सारखी टवकारून माझ्याकडे पाहत होती..  मीच शरमेने मान खाली घालून जेवलो..)
नवरदेवाची आंघोळ उरकली होती, आता मुलाला तयार करण्यासाठी चार पाच मुलं मुली त्याच्या भोवती थांबली होती..  काही जण फेटा, काही जण मुंडावळ्या, मळवट, मेकअप, किरीट यांच्या मागे लागले होती..  जो तो आपोआपले काम नियोजन बद्ध पद्धतीने करत होते.. मुलाची नुसती हेळसांड चालू होती..  कोण म्हणतयं इकड बघ..  कोण म्हणतयं तिकडं बघ..  कोण म्हणतयं आमूक करं..  तमूक करं..
बिचार्‍या सुहासला फोटोग्राफर, मेकप वाल्यांनी, वेशभूषा वाल्यांनी, वयोवृद्ध लोकांनी, रीती रिवाजांनी नुसतं पिडलं होतं..  लग्नापर्यंत उपवास असल्याने खिचडी पोहचली आणि त्यानं ती गट्मं केली..
आणि नवरदेव वाजत गाजत श्रीवंदनाच्या पूजेला निघून गेला.. पुजा आटपली.. आणि घोड्यावरून नवरदेवाची वरात वाजत गाजत..  लग्न मंडपाकडे निघाली आमच्या सारखे हवसे नवसे मनाला येईल तसं वेड वाकडं वरातीत नाचू लागले... वरात मंडपाजवळ आली होती... आम्ही नाचण्यात गुंग होतो.. जरा बाजूला नजर गेली तर ती मघाचशी मुलगी पुन्हा टवकारून पाहतचं होती.. (च्या मारी हा काय नवा वैताग...  आधीचं मिटता मिटता नाकी नवं आलयं.. मनात पुटपुटलो)
.
क्रमशः





_____मनोज भिलारे

PART 25 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.? )


(जस्ट इमॅजीन)


पोहे खाऊन स्टँड मध्ये पोहचलो..  आणि समोरच पुणे गाडी लागली होती..  एस्टीत चढलो.. आणि ऐस पैस पाय पसरून बसलो..  सकाळची वेळ असल्याने गाडी बर्‍यापैकी रिकामीच होती..  पाचेक मिनीटात गाडी सुटली..  हळूहळू अंधार मिटत होता आणि सुर्य उगवत होता.. एकदम प्रसन्न अल्हाद दायक वातावरण होते.. खूप छान वाटत होते..
मी शिटवर एकटाच असल्याने थोड कंटाळवाण वाटत होतं, साधारण 8 - 8.30 वाजले असतील साताऱ्यात पोहचलो होतो..  आता थोडी वरदळ वाढली होती.. कामासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, कार्यक्रमासाठी आणि दवाखान्यात जाण्यासाठी अशा विविध कारणांनी एस्टीत गर्दी वाढत होती.. सर्व शिट जवळजवळ भरल्या होत्या. माझ्या शेजारी एक गृहस्थ आपल्या मुलासोबत येऊन बसले होते.. काही वेळातच त्यांचा छोटासा मुलगा खिडकी शेजारी बसण्याचा हट्ट करू लागला..  मी चांगुलपणा दाखवत.. मी आलीकडे सरकलो आणि त्यांना पलिकडे खिडकीजवळ बसण्यास सांगितले..  थोडा ही नकार न नोंदवता मुलासाठी बिचारा बाप खिडकीजवळ बसला..
एक एक स्टॉप उलटत होते तसतशी गर्दी वाढतच होती..  आता उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती.. कात्रजला गाडी थांबली तसे काही लोक उतरले तसे त्या पेक्षा जास्त लोक एस्टीत चढलेही.. त्या मधे वयोवृद्ध एक वाकलेली आजी डोके वर काढत चढली..  तिने काठी टेकत टेकत इकडे तिकडे बसण्याचा प्रयत्न केला पण तिला जो तो धुडकावून लावू लागला..
मधून मधून कंडक्टरचा आवाज येतच होता..  चला पुढे सरका, बोला तिकीट..  चला पुढे...
या गोंधळात ती आजी माझ्यापर्यंत येऊन पोहचली होती.. आणि म्हणाली..  लेकरा, जरा सर तिकडं जरा बसायला जागा दे...
तसा मी पटकण चांगुलपणा दाखवत उठलो आणि आजींना बसायला जागा दिली... काही वेळातच आजीच्या ओळखीच्या एक इसम त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला..  आणि आजी सोबत हितगुज रंगल..
गाडी मुळशिंग पर्यंत पोहचली होती...  आजी उठल्या आणि त्या धुळकट चेष्मातून एक नजर माझ्या कडे टाकली आणि ओळखीच्या इसमाला बसायला जागा दिली.. मी अश्चर्याने बघत राहिलो..
ते म्हणतात ना मदत केली आणि.....  तसचं काहीसं घडलं होतं आणि चांगुलपणा म्हणून मुळशिंग पासून पुणे स्टेशन पर्यंत उभा राहून प्रवास केला होता.. पायाला नुसते गोळे येत होते..
पुणे स्टेशनला उतरलो सकाळचे 11 वाजले होते..
पत्रिकेवर पत्ता पुन्हा एकदा पाहीला पुणे स्टेशन मागे,  पाटील मंगलकार्यालय असा पत्ता होता..
.
.


____मनोज भिलारे

PART 24 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)




Part 24 (जस्ट इमॅजीन)

.
चालू महीण्याचे राहिलेले दिवस नेहमी प्रमाणे नित्यनेमाने संपून गेले..  असे दिवस पटापट नित्यक्रमाणे संपले की मला असं वाटतं की आपण वडाप चे ड्रायव्हर आहोत..  जसा ड्रायव्हर एका गावाहून दुसर्‍या गावी आणि तिथून पुन्हा पहील्या गावी प्रवाश्यांना सोडतो..  तसाच "मी नित्यक्रमाच्या वाहनातून सकाळच्या गावापासून रात्रीच्या गावापर्यंत आणि तिथून पुन्हा सकाळच्या गावापर्यंत आयुष्य नावाच्या प्रवाश्याला फिरवत असतो"
असो तिथून दहा तारखेपर्यंत पगाराची वाट पहाण्यात आणि त्याचे नियोजन करण्यात दिवस नेहमी प्रमाणे संपून गेले...  पगार झाला..  सगळी बिलं भागवण्यात आणि घरातील साहीत्य आणण्यात चार दिवस गेले..

आता लग्नाला जाण्याची तयारी चालू आहे..
सोबत सौही येणारच होत्या..  पूर्ण नियोजन झाले होते.. सकाळी पहाटे लवकर निघून लग्न आटपून संध्याकाळी परतण्याचे ठरले..
अॉफीसात रितसर सुट्टी टाकली होतीच..
ठरल्याप्रमाणे 17 तारीख उजाडली..  पण अचानक सौंची तब्येत बिघडल्याने त्यांनी येण्यास नकार दिला..
मी पहाटे आवरून 5 वा.  एस्टी स्टँडवर पोहचलो..
घरापासून 5-6 किलो मीटर च्या अंतरावर स्टँड आहे.. आणि तिथे पोहचायला ही वाहनं मुबलक आहेत..
चौकशी नंतर कळाले की पुणे गाडी 5.15 आहे..  खूप दिवसांनी एवढ्या लवकर उठल्याने पहाटे पहाटे भूक लागली होती..  स्टँडबाहेर आलो एका हातगाडीवर पोहे घेतले... आणि उद् भरण चालू केले.....
(तसही मला बाहेर खायला आवडत नाही पण नाइलाजाने कधी कधी बाहेर खातो.. आणखी म्हणजे सांगलीतील गाड्यांवरच्या पोह्यांची चवंचं निराळी..  आणि आठवणी ही भन्नाट.. लग्नाच्या आधी सगळ्या मित्रांची फोनाफोनी रात्री 12-1ला व्हायची आणि आम्ही 10-12 मित्र त्यानंतर पोहे खायला स्टँडवर जमायचो..  कधी कधी पहाटे 3-4 ला  ही हा प्रकार घडला आहे.. कधी कधी कोणा मित्राच्या कार्यक्रमावेळी रात्री घर रंगवता रंगवता..  तर कधी रात्र पाळीमध्ये काम उरकल्यावर आम्ही पोहे खाण्यासाठी पोहचत असू..  गप्पा मारता मारता कधी प्रत्येकी 2-3 प्लेट पोहे हानून व्हायचे ते कळायचं देखिल नाही..
असो ह्या सार्‍या आठवणीच...
 कारण हल्ली 9 नंतर जरी बाहेर पडलो तरी काय काम आहे..  दिवसा करता येत नाहीत का..
मग मी म्हणतो पाय मोकळे करून येतो.. मग उत्तर येत दिवसभर काय पाय बांधलेले असतात..  आणि झिरपिट चालू होते.. म्हणून हल्ली रात्रीच्या वेळी बाहेर जाणे टाळतो..
.
त्या पोह्यांचं नाव जरी काढलं तरी नाकात नुसता खमंग घमघमाट सुटतो..  अहाहा काय ते चविष्ट पोहे..  वरून बारीक शेव आणि कोथिंबीर मारलेली..  सोबत लिंबाची फोड..  आंबट गोड सांबार.....  एकदा पोहे खाणारा माणूस, दुसर्‍या वेळी पोहे न खाता तिथून जाऊच शकत नाही..
ते गाडे आजही तसेच चालू असतात रात्री 11ते सकाळी 8 वाजेपर्यंत..)
.
क्रमशः



_____मनोज भिलारे

PART 23 ( तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)





(जस्ट इमॅजीन)

फोन उचलताच एक घनघणीत आवाज कडाडला...
X : काय बे, लै मस्ती आलेय का, फोन बिन उचलत नाहीस.. लय हेर रिपोटर लागून गेला का बे..
त्या हाफीसात काय कामं करता चांगलंच ठावं हाय मला..
एक तरं नंबर मिळवायला किती ताप झाला..
आता बोल की रं असा का घुम्यावाणी गपं झालासं..
(एक तरं हा बोलायला संधी देईना...  कोण आहे ओळख सांगेना...  नुसता तोंडाचा पट्टा सोडला होता आणि बोलकी असं पण म्हणत होता)
मी सभ्य आवाजात (त्या पोरीचा विषय माहीत नसल्याचा आव आणून) कोण आहात आपण? कोणाशी बोलायचं आहे आपल्याला? कशासंदर्भात बोलताय आपण?
(माझे प्रश्न ऐकताच तोही थोडा मऊ पडला)
तोही सभ्यतेने म्हणाला.. मी सुहास....  सुहास दबडे..
तुम्ही मनोज भिलारे बोलताय ना.. नसेल तर स्वारी..
माझ मित्र मनोज असेल म्हणून बोलत राहीलो..
मी : हरामी कुत्र्या आज आठवण झाली का मित्राची,
एवढ्या वर्षानंतर मित्राची याद आली, कुठ बोंबलत हिंडत होतास इतका दिवस..
बाकी काय चाललंय लग्न वैगरे काही केलस की नाही..
(आम्ही तसे लंगोटी यार पण कामाच्या धकाधकीत दहावी होऊन बारा वर्षे कशी उलटली काही कळालचं नाही.. साधारण दहा बारा वर्षापुर्वी सुहास पुण्यात एका बिल्डरकडे नोकरी निमित्त गेला होता.. सुहासचं वाढत्या वयात भोकाड फुटल होतं म्हणजे कंठ फुटल्याने त्याचा आवाज ओळखू नाही शकलो..
पण स्वभाव मात्र तसाच होता असं बोलण्यातून तरी जाणवत होतं)
सुहास : अरे बाबा त्या साठीच पत्रिका द्यायला तुझ्या घरी आलो होतो.. दोन दिवसांपूर्वी त्या साठीच फोन केला होता, तुझी निवांत वेळ कळेल आणि भेटता येईल म्हणून..  पण तुम्ही फोनच उचलत नाही साहेब..
काय करायचं आमच्या सारख्या गरिबानं..
(त्यानं पुढच्या महिन्यातील 17 तारखेला सगळ्यांनी येण्याबद्दल आग्रहाचं निमंत्रण दिलं..)
सुहास : लग्न पुण्यात आहे.. आणि तू आलाच पाहिजेस काही कारण चालणार नाहीत..
(मी कारण देण्याआधीच तो बजावून मोकळा झाला होता)
मी: येतो रे देवा, करतो काहीतरी सुट्टीचं पण येतोच..
बाकी नोकरी वगैरे कसं चाललयं.. पगार बिगार वाढतोय का नाही साहेब..
सुहास : अरे साहेबा, नोकरीच काय घेऊन बसलायसं..
ईस्टेट डेव्हलपमेंटचा छोटासा धंदा करतोय.. बंगला आणि तीन फ्लॅट आहेत पुण्यात..
असो परत निवांत बोलू..  बाहेर ड्रायव्हर ताटकळत उभा आहे.. आजून खूप पत्रिका ही वाटायच्या आहेत...
बाय बाय..
मी : हो नक्की आता नंबर ही आहे..
काळजी घे
बाय..  पुन्हा भेटूच
.
क्रमशः
.
____मनोज भिलारे