Tuesday, October 3, 2017

PART 23 ( तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)





(जस्ट इमॅजीन)

फोन उचलताच एक घनघणीत आवाज कडाडला...
X : काय बे, लै मस्ती आलेय का, फोन बिन उचलत नाहीस.. लय हेर रिपोटर लागून गेला का बे..
त्या हाफीसात काय कामं करता चांगलंच ठावं हाय मला..
एक तरं नंबर मिळवायला किती ताप झाला..
आता बोल की रं असा का घुम्यावाणी गपं झालासं..
(एक तरं हा बोलायला संधी देईना...  कोण आहे ओळख सांगेना...  नुसता तोंडाचा पट्टा सोडला होता आणि बोलकी असं पण म्हणत होता)
मी सभ्य आवाजात (त्या पोरीचा विषय माहीत नसल्याचा आव आणून) कोण आहात आपण? कोणाशी बोलायचं आहे आपल्याला? कशासंदर्भात बोलताय आपण?
(माझे प्रश्न ऐकताच तोही थोडा मऊ पडला)
तोही सभ्यतेने म्हणाला.. मी सुहास....  सुहास दबडे..
तुम्ही मनोज भिलारे बोलताय ना.. नसेल तर स्वारी..
माझ मित्र मनोज असेल म्हणून बोलत राहीलो..
मी : हरामी कुत्र्या आज आठवण झाली का मित्राची,
एवढ्या वर्षानंतर मित्राची याद आली, कुठ बोंबलत हिंडत होतास इतका दिवस..
बाकी काय चाललंय लग्न वैगरे काही केलस की नाही..
(आम्ही तसे लंगोटी यार पण कामाच्या धकाधकीत दहावी होऊन बारा वर्षे कशी उलटली काही कळालचं नाही.. साधारण दहा बारा वर्षापुर्वी सुहास पुण्यात एका बिल्डरकडे नोकरी निमित्त गेला होता.. सुहासचं वाढत्या वयात भोकाड फुटल होतं म्हणजे कंठ फुटल्याने त्याचा आवाज ओळखू नाही शकलो..
पण स्वभाव मात्र तसाच होता असं बोलण्यातून तरी जाणवत होतं)
सुहास : अरे बाबा त्या साठीच पत्रिका द्यायला तुझ्या घरी आलो होतो.. दोन दिवसांपूर्वी त्या साठीच फोन केला होता, तुझी निवांत वेळ कळेल आणि भेटता येईल म्हणून..  पण तुम्ही फोनच उचलत नाही साहेब..
काय करायचं आमच्या सारख्या गरिबानं..
(त्यानं पुढच्या महिन्यातील 17 तारखेला सगळ्यांनी येण्याबद्दल आग्रहाचं निमंत्रण दिलं..)
सुहास : लग्न पुण्यात आहे.. आणि तू आलाच पाहिजेस काही कारण चालणार नाहीत..
(मी कारण देण्याआधीच तो बजावून मोकळा झाला होता)
मी: येतो रे देवा, करतो काहीतरी सुट्टीचं पण येतोच..
बाकी नोकरी वगैरे कसं चाललयं.. पगार बिगार वाढतोय का नाही साहेब..
सुहास : अरे साहेबा, नोकरीच काय घेऊन बसलायसं..
ईस्टेट डेव्हलपमेंटचा छोटासा धंदा करतोय.. बंगला आणि तीन फ्लॅट आहेत पुण्यात..
असो परत निवांत बोलू..  बाहेर ड्रायव्हर ताटकळत उभा आहे.. आजून खूप पत्रिका ही वाटायच्या आहेत...
बाय बाय..
मी : हो नक्की आता नंबर ही आहे..
काळजी घे
बाय..  पुन्हा भेटूच
.
क्रमशः
.
____मनोज भिलारे

No comments:

Post a Comment