Saturday, September 30, 2017

PART 22 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)






 (जस्ट इमॅजीन)
.
वावटळ उठता उठता विरून गेलं..
दुसर्‍या दिवशी नेहमी प्रमाणे अॉफीसात पोहचलो..  अक्षताचा इतिहास काढण्यासाठी तिची प्रोफाईल चाळू लागलो..  तिचा पत्ता.. पुणे.. एवढाच आणि फोन नंबर ही नव्हता..
पुढचे सलग दोन दिवस अधून मधून फेसबूक उघडून पहायचो.. तिने अन् ब्लॉक करून एखादा मेसेज केलाय का हे पहाण्यासाठी...  पण ती गेली ती गेलीच...

  मी ठरवून सगळं वाईट स्वप्नासारखं माग सोडलं..  रोजचा नित्यक्रम चालू झाला..
अॉफीस, घर, मित्र, लिखाण आणि वाचन..
पुन्हा माझ्या विश्वात जाऊन पोहोचलो होतो..
 चार पाच दिवसात अपरिहार्यपणे दुसरा मोबाईल घ्यावा लागला..
आज वादळ उलटून पंधरा एक दिवस ओलांडले होते,
बारा एक च्या सुमारास फोन वाजला..
अनोळखी नंबर होता..  पुन्हा तोच अक्षताचा विचार मनात थैमान घालू लागला..
(मनातले विचार : तिचाच फोन नसेल ना,  आता कशासाठी केला असेल...  तिला नंबर कोठून मिळाला असेल..
अरे फेसबुकवरून घेतला असेल..
तिला आणखी शिव्या शाप तरी द्यायच्या नसतील ना..
का पुन्हा आणि काही..
तिनं बोलल्या प्रमाणे आत्महत्या वैगरे तरी केली नसेल ना..
केली असल्यास माझ्या नावाने..  चिठ्ठी किंवा इतर पुरावा तर ठेवला नसेल ना..
मला शिक्षा होईल ती वेगळीच पण.. नाव बदनाम किती झालं असतं..
आणि
.
" मैं शायर बदनाम मैं चला, मैं चला
महफ़िल से नाकाम मैं चला, मैं चला

मेरे घर से तुमको कुछ सामान मिलेगा
दीवाने शायर का एक दीवान मिलेगा
और एक चीज़ मिलेगी, टूटा खाली जाम

शोलों पे चलना था, काँटों पे सोना था
और अभी जी भर के किस्मत पे रोना था
जाने ऐसे कितने बाकी छोड़ के काम

रस्ता रोक रही है, थोड़ी जान है बाकी
जाने टूटे दिल में क्या अरमान है बाकी
जाने भी दे ऐ दिल, सबको मेरा सलाम...
...
आनंद बक्षी साहेबांचं गाण गुणगुणत बसलो असतो.)
एवढ्या विचारमंथनात चार मिसकॉलचे जहाज 🚢 बुडाले होते..
आता विचार केला.. जाऊ दे जे होईल ते होईल....  आता वाजला तर फोन उचलायचा..
बघू पुढचं पुढं...
दिवसभर वाट पाहीली पण पुन्हा फोन काही आला नाही..
मी नंबर फक्त 'x 'या नावाने सेव करून ठेवला.
दोन दिवस असेच मजेत गेले
आणि तिसर्‍या दिवशी फोन वाजला आणि तोच अनोळखी नंबर आता ठरवल्या प्रमाणे फोन उचलला...
.
क्रमशः
.


_____मनोज भिलारे

PAR 21 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)





 (जस्ट इमॅजीन)
.
मी आवाज दिला..
अहो ऐकलत का..  उठा आता..  खाऊन घ्या थोडसं
(अजिबात प्रतिक्रिया नव्हती)
जेवणावर कसला राग करायचा तो..
खाऊन घ्या आणि काय बोलायचं ते बोलून घ्या..
मी अपराधी आहे मान्य आहे..  तुम्ही द्याल ती शिक्षा कबूल..
(एवढं सांगून सुद्धा काहीच प्रतिक्रिया नाही, मी उठून किचनकडे गेलो)
बहीण : काय हवं आहे का दादा
मी :काही नको, तु जेव..
(दोन रिकामी ताट घेऊन माझ्या खोलीत आलो जेवणाची ताटं झाकत)
मी :स्वतःला कशाला शिक्षा करतेस, प्लीज जेऊन घे..
तू नाही जेवलीस तर मीही नाही जेवणारं
सकाळपासून निरंकार उपास चालूच आहे..  आता असा उपाशीच झोपतो.
(असं बोलून विरूद्ध दिशेला तोंड फिरवून झोपलो, बरं झालं भजी तरी खाऊन आलो नाहीतर काही खरं नव्हतं माझं, रिकाम्या पोटानं आपलं टकूरं लगेच आणि लै तापतयं, भर होती म्हणून सारं शांत होतं)
दहा पंधरा मिनिटांनी बहुतेक तिकडेही कावळे ओरडत असावेत..
ती: अहो ऐकलत का
(आता माझी बारी आली होती, मी घट्ट डोळे मिटून मौनातचं)
ऐकताय ना, उठा ना, जेऊन घेऊ..
मी :भूक नाही
ती: असं कसं चालायचं, खाल्लं नाही तरं काम करायला ताकद कशी यायची..
तुम्ही अशक्त झाला की सारं घर अशक्त होतं..
उठा आता,
मी (उठत उठत) : तू अशक्त असलीस तर मी अशक्त होतो.. चल जेऊयात..  पुन्हा जेवणावर राग कधी काढू नको..
(दिवसभर रडून तिचे डोळे लालबुंद झाले होते, बाकी काही न बोलता जेवण उरकले)
(भांडण मिटल्याने मनोमन मोकळा श्वास घेतला)
.
.
क्रमशः.......

.
((मित्रांनो तुम्हाला काय वाटतं??
ही कथा संपली??
इथं ही कथा संपवायला पाहिजे??
खरचं भांडण संपल असेल??
ती प्रेमकथा संपली असेल??
बायकोनं आईला किंवा इतरांना काही सांगितलं असेल??
कथेला नवीन वळण लागेल का??
.
.
.
तुमच्या प्रतिक्रियाच पुढची कथा ठरवतील...!
तुमच्या प्रतिक्रिया लिहायला भाग पाडतील ही अपेक्षा..?))
.


______मनोज भिलारे

PART 20 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)






 (जस्ट इमॅजीन)
.
कसेबसे सहा वाजले अॉफीस सुटले..
माझे मात्र बारा वाजले होते, कारण एक म्हणजे पोटात चांगलीच आग पडली होती आणि दोन म्हणजे सकाळी निघताना संध्याकाळी बोलू असे सांगितल्याने राहिलेली  औषध घरी पाहताच मिळणार होती..
पोटाला मिळेल की नाही.. याची शंकाच होती..
अॉफीस मधून याच विचाराने एका हॉटेलमध्ये घुसले दोन प्लेट भजी घेतली.. गटागट अधाश्यासारखी खाल्ली, आणखी भूक होती पण राहू दे म्हटलं घरी जेवण नाही गेलं तरं औषधाचे डोस डबल होतील म्हणून..
मग चहा घेतला आणि घरी निघालो..  जरा आळम् डळम् करत मुद्दामच उशिरा घरी पोहोचलो...
खूप कामाने वैतागल्यासारखा आव आणत घरात घुसलो..  आई स्वयंपाक बनवत होती बहीण मदत करत होती.. भाऊ आणि आजी टिव्ही पाहत होते..
(मनात म्हटले हीनं माहेर गाठलं वाटतं, आता सगळ्या सासूरवाडीत सोहळा होतोय आपलाच)
बॅग काढता काढता आईला विचारलं.. आई ही कुठं हळदी कुंकवाला गेली आहे का गं..
आई : अरं बाबा सकाळच्यानं बोलत न्हाय,  खात न्हाई, पित न्हाई.. नुसतीच झोपलीया खोलीत....
तू इचार काय दुखतय का..  तुलाच सांगल ती आणि घेऊन जा इस्पितळात...
.
मी आईला बोललो..  बघतो मी..
(जिव जरासा भांड्यात पडला पण दिल्ली अभी बहोत दूर थी)
रूम जाऊन फ्रेश झालो...
जवळ जाऊन  बसलो..  न बोलताच शेजारच पुस्तक उचललं आणि वाचल्यासारखी नजर फिरवू लागलो..
एक दिड तास असाच गेला...  तेवढ्यात बाहेरूनच जेवणासाठी आवाज आला..  मी आतून  सांगितले माझं आणि वहिनचं ताट इकडच आणून दे प्लिज..
ती  न बोलता निघून गेली आणि दहा मिनिटातच दोन ताट जेवण घेऊन आली नंतर पाणी ही घेऊन आली..   आणि म्हणाली काही लागलं तरं आवाज दे आम्ही पण जेवायला बसतोय..
मी थँक्यू म्हणालो
असं काय रे दाद्या, म्हणत ती निघून गेली
.
.
क्रमशः


____मनोज भिलारे

PART 19 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)






 (जस्ट इमॅजीन)

मी..
प्लीज ऐक.. ऐक ना..
पुन्हा मी एक मेसेज केला..
आपण शांतपणे बोलू..  तुझा नंबर दे..  मी फोन करतो..
आणि पुन्हा एकदा स्वारी
..
हा मेसेज काही केल्या जाईना..
मला ब्लॉक केलं गेलं होतं..
(मनातल्या मनात.. च्या मारी एकतर या बयान स्वतःहून विचारलं  लग्नासाठी, मी ह्यांव करीन त्यांव करीन..  जानू काय आणि काय काय.. तुझं माझं काय...
आणि आता हीच बया पाटीत मावायच्या नाहीत एवढ्या नको तसल्या शिव्या शाप देतेय..  काय मी लागलो होतो का हिच्या....
.
"खऱ्या प्रेमिका या अशा
सगळं प्रेम यांच असं वाहून गेलं
आणि माझी काय चुक होती?
तिला विचारायचं राहूनच गेलं.. "
.
असो आजचा दिवसच छान मुहूर्ताचा होता..
सकाळी सकाळी मोबाईल गेला पाणीपतात..
नंतर एकतर्फी सौ नी आक्रमण केलं..
नाष्टा जेवणावर तर संचारबंदीच लागली होती..
साहेबांनी राऊंड घेतला होता..
आणि जिच्यामुळे सारं घडलं तीही तिचं देण काढल्या सारखं नको ते ऐकवून न ऐकताचं गेली..
माझं मात्र असं झालं होतं.. "खाया पिया कुछ नही ग्लास तोडा बाराणा...")
.
.
क्रमशः



____मनोज भिलारे 

PART 18 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)





(जस्ट इमॅजीन)
एक ना दोन अश्या अनेक शिव्यांचा धो धो पाऊस पडत होता आणि मी चिंब चिंब भिजत होतो..
रिप्लाय देऊन स्पष्टीकरण द्यायला संधी सूधा देत नव्हती... आता वीसेक मिनीटे ओलांडून गेली तरी हा प्रकार चालूच होता..
मी आता संधीची वाट न पहाता एक मेसेज केला
"स्वारी"
तीचा रिप्लाय..
हरामखोरा फक्त स्वारी, तुला तर भर चौकात चाबकाचे फटके दिले पाहिजेत..  गाढवावरून धिंड काढली पाहिजे..
पून्हा मी
माफ कर मला, मला तूला दुखवायचं नव्हते
पुन्हा ती
डूकरा मग दाखवून पाहीलस का..
माझ्या डोक्यात जाऊ नको..  आहेस तिथं येऊन मुस्काट फोडून.. तमाशा करेन
(आता पूरता तमाशा तर झालाच होता)
मला कधीच संपर्क करण्याचा प्रयत्न करू नको मी तूला ब्लॉक करतेय..
मी...
ए ऐक ना अक्षता..
माझ ऐकून तरं घे
ती..
बिलकूल काही सांगू नको...
.
.
क्रमशः



______मनोज भिलारे

Friday, September 29, 2017

PART 17 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)







(जस्ट इमॅजीन)

एक एक मेसेज पुढे पुढे वाचत होतो.. सगळे तिचे म्हणजे अक्षताचे मेसेज होते.. आभाळ एकदमच भरून यावं आणि धुवांदार बरसावं तसं काही दहा मिनिटे झाले तरी मेसेज येतच होते.  वाचण्याच्या नादात रिप्लाय देणं जमलचं नाही..
मेसेज अनुक्रमे
1.तूझ्या इतका स्वार्थी माणूस पाहीला नाही आज पर्यंत स्वतःला फार शहाणा समजतोस नालायका..
मला दुःखविण्या साठीच तू ही खेळी खेळलीस..
मी तुझी इतकी काळजी करते आणि तू असा निघालास..
2.परमेश्वर इतका कठोर असेल आणि माझ्याशी निर्घृण चेष्टा करेल असं स्वप्नात देखील वाटलं नाही
3.चित्रपटातला विलन बरा किमान तो सरळ वार तरी करतो कोणाच्या मनाशी असा खेळ करत नाही..
4.तू नीच आहेस, हलकट आहेस, हरामखोर, लांडगा, धूर्त कोल्हा आहेस..  तूला लाज कशी वाटली नाही..  मला फसवताना.. निर्लज्जपणाचा कळस आहे..
5. मला तुझं काळं तोंड कधीच दाखवू नकोस, एवढ्या जगात तूला उल्लू बनवायला कोणी भेटलचं नाही का..
माझी चूक एवढीच की मी माणूस ओळखायला चुकले आणि आयुष्यातली ही सर्वात मोठी माझी चूक होती..
6. पुन्हा कोणाच्या आयुष्याशी खेळू नको...
रेड्या, म्हसोबा मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही..
7.  मला उध्वस्त केलसं..  मला जगायची इच्छाच सोडली नाहीस..  खूप हताश केलस..  या आधी कोणीच मला इतकं दुःखवलं नव्हतं
8. काही तरी फडतूस लिहीतोस..  आणि स्वतःला मोठा कवी समजतोस नीच माणसा.. तूला ओळखतं का कोणी हरामी कुठचा..
9. शब्द जुळवून कोणी कवी होत नसतं...  माझ्याशी लग्न करायची तुझी लायकी तरं आहे का..
दळभद्री, भिकारडा कुठचा..  तुझ्या सारखे छप्पन मागे आहेत..
10. तुझ्या महीण्याच्या पगाराइतका माझा दिवसाचा खर्च आहे..  तू काय समजलास स्वतःला, तूला अद्दल घडवल्या शिवाय सोडणार नाही..  गाठ माझ्याशी आहे.. फालतू कुठचा हरामी कुत्रा.. . बिनकामाचे शहाणे गळ्यात पडतात..
,,,,,,,,,,,,,,,,,
.,,,,,,,,,,,,
.
क्रमशः
.


______मनोज भिलारे

PART 16 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)





 (जस्ट इमॅजीन)
सकाळी सकाळी पार हिरमोड झाला होता, या सार्‍या दंगलीत अॉफीसात पोहचता पोहचता 10.30 होऊन गेले.. नशीब आजून सिनीयर आले नव्हते..  आधीच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला होता..
फाईलींच्या गठ्यांनी आधीच टेबलला हजेरी लावली होती..  मस्टरवर सही करून मोर्चा फाईलींकडे वळवला आणि कंप्युटर चालू केला..
कामात काही लक्षच नव्हते म्हणा..  रात्रीचा विषय आजून डोक्यात लोणच्यासारखा मुरत होता.. आदी त्याची विल्हेवाट लावल्याशिवाय कामात लक्ष लागायचं  नाही म्हणून आदी नेट चालू केलं..  बर्‍याच प्रयत्नांनी ते चालू झालं... फेसबुक चालू केलं आणि तिचा मेसेज हुडकण्यात मग्न झालो..
तेवढ्यात सिनीयर कधी मागे उभे राहिले काही कळालचं नाही..  काय भिलारे आज सकाळी सकाळी..  अर्धवट वाक्य तोडत त्यांनी केबीनमध्ये बोलावलं.. मी सर्व बंद करून त्यांच्या केबीनमध्ये गेलो. एवढा समोर कामाचा ढिग दिला असताना तुमचं फेसबुकवर काय..  तुम्हाला काम होतय की नाही हे गुराळ चालू झालं..
क्लायंटचा मेसेज शोधत होतो थुका पॉलीश करून तिथून ही निसटलो.. आणि सरळ माझ्या टेबलावर येऊन कामाला सुरुवात केली..
अधून मधून फेसबुक उघडून तिचा मेसेज आलाय का पाहू लागलो..  दुपारी एक वाजता जेवणाची सुट्टी झाली सकाळच्या संचारबंदीने जेवणावर बंदी आणली होती. सकाळ पासून निरंकारी उपवास घडलाच होता आणि डबा नसल्याने समोरच्या हॉटेल मध्ये जाऊन नाष्टा केला आणि चहा सांगितला..
 (ढग पाहून ओळी पुटपुटणारा मी) बाहेर काळेभोर ढग दाटले होते तरीही मी माझ्याच विचारात चहा पिऊन अॉफीसात पोहचलो..  फेसबुक पाहीले.. तर टपाटप मेसेज टपकत होते..
.
क्रमशः........
.
.
_________मनोज भिलारे

PART 15 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)



 (जस्ट इमॅजीन)
जवळ जाऊन खांद्यावर मी हात ठेवला तसा तिने एक हजार होल्टचा करंट लागावा तसा झिडकारला आणि अखेर मौनाचा बांध फुटला...
तापलेल्या सुर्यासारखे लालबुंद डोळे..  अचानक वादळाला उधाण यावं तसं काहीसं...  तोंडाच्या तोफखान्यातून आग ओकू लागली...
काय चाललंय हे??  काय कमी पडलेयं???  कशाला हवेत नसते धंदे??  रात्रभर भवाण्यांबर काय बोलायचं ते??  माझ्याशी बोलायला कधी दोन मिनिटे वेळ नसतो...
(ऐकून डोक्यात ट्युब पेटली मोबाईलची पेस्ट कशी झाली..  आता माझे मौन होते आणि तिकडून आक्रमण चालू होते)  माझं नशीब..  फुटलं रे देवा...  कोणाशी गाट मारलीस रे बाबा..  माझ्यावरच का हा प्रसंग..
मी काय तुझं वाकडं केलं...  असलं माझ्या पदारात टाकलसं..  (मी समजवायचा प्रयत्न करत होतो पण तिची ऐकण्याची तयारी दाखवेना कसंबसं करून घरात न्हेलं) आणि बोललो फक्त मेसेज मध्ये बोललो होतो..  बाकी काहीही केलं नाही..  आणि सूरवात तर तिनं केली होती..
पुन्हा विजेसारखी कडाडली...  म्हणाली म्हणजे मी सगळ होईपर्यंत वाट बघत बसायचं होतं..  उद्या त्या सटवीला सवत करून घ्यायचं होत आणि माझा देवगुणी नवरा तिला साथ देणारं आणि तूम्ही कविता कविता खेळत बसणार आणि मी प्रेक्षक होऊन टाळ्या पिटत बसते..  तूम्ही करा घराण्याचे नाव मोठं..
मी आपला न ऐकल्या सारखं करून अॉफीससाठी वेळ होतोय संध्याकाळी बोलू म्हणतं निसटलो..
.
.



___मनोज भिलारे 

PART 14 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.? )




व्हरांड्यात बायको मान गुडघ्यात घुसवून हुंदके देत बसली होती..
आपोआप माझा राग शांत झाला होता..  न राहून जवळ जात मी विचारलं काय झालं..??
काय दुखतंय का? कोणी काही बोललं का..?
मी प्रश्नांचा भडिमार करतोय आणि तिचं मात्र मौन..
हे मौन पाहून माझीच कविता मला आठवली..

{} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} {} थोडे मौन पाळतो आहे, काही बोलणे टाळतो आहे...
कैक उठले बाजार, राहीले जिन्नस जाळतो आहे...
.
जीवघेणा कसा महापूर ओसांडला दर्दी दुःखांचा
हव्या नकोत्या आवडल्या भल्या वेदना चाळतो आहे...
.
दुकाने मांडली महागाईची, तिला झाली महा घाई
तिची मोडण्याच खोड, हीन पैश्यामागे पळतो आहे....
.
लावले होते धान्य, टपोरे दाणे टिपले पाखरांनी
राहिले भुसकाट सुगीच्या दिवसात मळतो आहे....
.
खोल दरवळून गेली गंधीत प्राजक्ताची सुमने
करपल्या न विकल्या गजर्यांनाच मी भाळतो आहे..
.
सोडून दिली कबुतरे कुत्री खवसाट माणसांची
प्रामाणिकच चिडलेले जखमी शेर पाळतो आहे...

.

_________मनोज भिलारे

PART 13 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)




तळपायाची आग मस्तकात पोहचली होती..  बेडरूम मधून बाहेर येता येता मी तापट स्वरात अहो ऐकलं का...? कुठ आहे तुम्ही...? काय करताय..? माझा मोबाईल पाहीला का?
घरात एकदम भयाण शांतता पसरली होती.. फक्त माझा आवाज घुमत होता.. या वेळी रोज फक्त सौ घरी असायच्या पण त्या ही दिसेना झाल्या होत्या..
अजिबात काही सुचत नव्हते..  मोबाईल बंद पडलाय, बायको घरात नाही, आॅफीसला ही उशीर होतोय..
तरी सुद्धा सर्व खोल्या आवाज देत देत ढुंडाळल्या..
टेरेस पालथे घातले..
काही दिसेना..  माहेरला एक - दोन दिवस जातानाही पन्नास वेळेला जाऊन येते सांगणारी, दुध वेळेवर तापवा, जास्त पसारा करू नका..  एक ना अनेक..
आणि ती अचानक अशी कुठ गेली..  सुट्टी टाकून सारं निपटावं म्हटलं तर मोबाईल वारीला गेलेला आणि त्यात सारे नंबर..
पटापट अवरायला सुरवात केली..
अंघोळ वगैरे अटपून चहाच पातेलं गॅसवर चढवलं..
आणि बिनसाखरेचा चहा पचवत अॉफीससाठी बाहेर पडलो..


.
.___________ मनोज भिलारे

PART 12 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)




क्षणार्धात डोळे उघडले...  पाहतो तर काय...  मोबाईल समोरच बेड खाली पडला होता..  पण अस्ताव्यस्त अवस्थेत..  मांजराने पाडाला असावा अशी कल्पना व्यक्त करत दोन चार शिव्या हसडत मोबाईलकडे झेप घेतली..  सर्व भाग गोळा केले..  बेड खालून बाहेर आलो.. आणि मोबाईल जोडण्यासाठी प्रयत्न करताना लक्षात आले की काही मोबाईल च्या भागांचे असे तूकडे होते की कोणीतरी मिक्सर मध्ये बारीक केलेत...
हे कधी, कसं, काय झालं काही कळेना
रात्रीचा विषय डोक्यात घोळतचं होता आणि कधीही न जोडला जाऊ शकणारा मोबाईल हातात होता
.
.
_____मनोज भिलारे

Wednesday, September 27, 2017

PART 11 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)




 Part 11 (जस्ट इमॅजीन)
तिच्या रिप्लाय ची वाट पहाता पहाता डोळा कधी लागला आणि रात्र कधी उजाडली काही कळालचं नाही...
जाग येताच रात्रीचे विचार पुन्हा कसरत करू लागले..
डोळे चोळत मोबाईल शोधू लागलो तिचा रिप्लाय पहाण्याची खूप उत्सुकता लागली होती
 (जशी माझ्या मित्रांनो तुम्हाला ही लागली आहे)
कारण त्या रिप्लाय वर माझ भविष्य आणि आयुष्य बदलणं अवलंबून होतं..
होकार मिळाल्यास सर्व क्षणात पलटणार होतं
आणि नकार असल्यास कधीच पुढे न जाणारा बे चा पाढा होताच पुन्हा..
उशी खाली, आजूबाजूला, सर्व अंथरून झटकून पाहीले,  सर्व घरं पालथे घातले मोबाईल काही दिसेना...
सकाळी सकाळी मेंदूतून स्वतः वरच आग ओकू लागलो...  वैतागून जिव गेल्यासारखे, हारून आल्यासारखे खांदे पाडून डोळे मिटतं कपाटाला टेकून बसलो...
.
.
___मनोज भिलारे

PART 10 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)








"वेढा रे वेढा
तू असा कसा ठार वेढा... " हे तिचे शब्द मेंदूत बडवत होते,, , त्यामुळे तीच्या मनात उलट सुलट विचार येऊ नये म्हणून  पै पाहूनी, मित्र मंडळी, गावकरी यांच्या भाकरी भाजायचा विषय लांबणीवर ठेवला..
पण न राहून आणखी एक मेसेज केला...
तुझ्या सोबतीने माझ्या आयुष्यातले सगळे मोठे प्रश्न सुटले...
आनंदाने संसार करू...  तू अगदी राणीसारखी राहशील मला राजासारखं ठेवशील, घरच्यांची आपल समजून काळजी घेशील.. .  माझी सारी स्वप्न तुझ्या जोडीने आणि गोडीन पुर्ण होतील.. .
माझी शेवटची छोटीशी एक ईच्छा आहे..  ती तू आपली समजून पुर्ण करशील.. .
याची मला पुर्ण खात्री आहे.
आणि तु सोबत असशील तर अशा शंभर ईच्छा सहज पूर्ण होतील.. ."मी आभार व्यक्त करत शेवटची ओळ टाकली
 " मी  येताना सोबत माझ्या घरच्यांसह पत्नीला देखिल घेऊन येतोय.. .
"
.
Continue. ..
(प्रेयसी सवतीला सोबत ठेवण्यास तयार होईल??
प्रियसी आणि तिच्या सवती मध्ये संग्नमत होईल??
प्रेयसी येऊन कवीच्या मुस्काटात ठेवून देईल??
कवीला प्रियसी खरं प्रेम करणं दाखवून देईल??
या  सार्‍या प्रश्नांची उत्तरे उद्यासाठी.. .
तुम्हाला काय वाटते कृपया कमेंट्स मधे लिहा.)
.
_____मनोज भिलारे

PART 9 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )









काही क्षणातच तिचा रिप्लाय आला
वेढा रे वेढा
तू असा कसा ठार वेढा...
आता तुझं माझं काय करतोस
जे आहे ते आपलं आहे.. .
(या चार तासांच्या गप्पांमध्ये कधी एकमेकांचे झालो कळलचं नाही)
सर्व जबाबदार्‍या आपण दोघे मिळून पुर्ण करू...  सुखाचा संसार करू, मी सर्वांची काळजी घेइन.. .  तू नको काळजी करु डीयर
तू फक्त छान कविता. .. ...
आणि माझ्याशी लग्न करं
.
.
_______मनोज भिलारे