(जस्ट इमॅजीन)
(स्वतःचं सुखी आयुष्य सोडून कोण या सर्किट मुलीशी लग्न करायचं,,, मी मुद्दाम तिरस्काराचा आव आणून तिच्या भावाशी बोलू लागलो)
मी : किती मुर्ख असतात ना या मुली..! कोणावरही कसा सहज विश्वास ठेवतात आणि स्वप्न रंगवत बसतात.. अशा कित्येक मुली चॅटिंग केल्या आणि गेल्या.. आणि मी प्रत्येकेशी लग्न करत बसलो तर झालचं.. मी फक्त फेसबुकवर टाईमपास करत असतो..
(आता तिच्याकडे पहात)
यांना दोन चार शब्द गोड बोलले, जरा रूपाचं गुणगान केलं की चालू झाला टाईमपास.. यांच्यासारख्या छप्पनं भेटतात रोज..
(अक्षदा शांत होती पण तिच्या डोळ्यातून अश्रूधारा थांबून डोळे आग ओकत होते, आणि अमित ही खूप चिढला होता नाकातून येणारा नागाचा फुत्कार जाणवत होता, बहूतेक हॉटेल मध्ये तमाशा नको म्हणून तो शांत होता आणि मी आणखी भडकवत होतो)
कोण काय मला सांभाळणार.. मीच दोन - तीन संभाळून आहे.. असे गेले किती आणि आले किती आपल्याला फरक नाही पडत.. कोणी गेलं म्हणून काही थांबत नाही.. उलट नवीन काहीतरी चांगलं भेटतं..
अक्षदाने जागेवरून माझ्या मुस्काटात जोरात ठेवून दिली.. कानात सारा आवाज किरंरंरं झाला..
अमितने तिला आवरत बोलला मी बघतो नंतर याला तू चलं... आणि तिला सावरत तिला घेऊन गेला.. तीही लंगडत लंगडत त्याच्या आधाराने निघून गेली.. बाकीचे माझ्याकडे अपराध्याच्या भावनेने पहात होते.. मला वाटलं हे ही उठून हात साफ करून घेतायत की काय..
तेवढ्यात वेटर आला.. साहेब आणखी काय..
मी : (गालावर हात ठेवूनच) काही नको, पोट भरलं
वेटर : साहेब, बिल आणू
मी : आण
(पाचेक मिनिटात तो बिल आणि आईस्क्रीम घेऊन परतला 945 रूपये,)
मी : एवढे कशाचे लावलेस रे..
वेटर : तुमच्या सोबत जे साहेब आणि मॅडम होत्या.. ते दुपारी 3 वाजल्यापासून हितच होते.. त्यांच दुपारच जेवण, कोल्ड्रींक, संध्याकाळी चहा नाष्टा, आणि तुम्ही आल्यापासून चहा कॉफीच बिलं आहे हे.. आणि सोबत कॉम्प्लेमेंट्री म्हणून हॉटेल कडून आपल्याला आईस्क्रीम कप..
मी : अरे बाबा हे आईस्क्रीम घेऊन जा आणि त्या ऐवजी फक्त थोडा बर्फ घेऊन ये..
(थोडा गालाला लावता येईल आणि उरलेला डोक्यावर ठेवता येईल.. तोंडातचं पुटपुटलो..)
त्या बिचार्याने बर्फ आणला.. मी बिल पेड केले आणि गालाला बर्फ लावत बाहेर पडलो.. ते निघून गेले होते..
हे प्रकरण काही चूक न करताच खूप महागात पडले होते.. नऊशे पंचेचाळीस रुपये आणि जोरदार मुस्काटात..
घरी आलो फ्रेश झालो जेवलो आणि झोपी गेलो..
पुढच्या चारेक दिवसांनी सुहास नव्या नवरीला घेऊन देवाला आणि सर्वांना नमस्कार करण्यासाठी सांगलीत आला... दुसर्या दिवशी फोनवर बोललो त्या प्रमाणे संध्याकाळी नदीच्या घाटावर भेटलो.. मी काही बोलण्याच्या आधीच
सुहास : हे तू काही बरोबर केलं नाहीसं, कोणाला फसवावं हे ही कळत नाही.. आणि तूला हे नसते धंदे हवेतच कशाला.. किती लोकांना फसवलं आहेस.. मी तुला खूप चांगला समजत होतो..
मी : माझं थोड ऐकून तर घे
सुहास : काय शिल्लक ठेवलयसं आता ऐकायला.. मला सगळ सांगितलय अमित साहेबांनी.. मला खूप लाज वाटते आहे तूला मित्र म्हणताना
मी : आधी ऐकून घे.. मग तू म्हणशील ते खरं..
फेसबूकवरचे पुरावे दाखवत पुर्ण कहाणी रिवाइंड करून सांगितली.. आणि शेवटी हॉटेल मधे असा का वागलो तेही सांगितले..
मी : मी जर असा वागलो नसतो तर, ती हट्टी मुलगी ऐकली नसती.. आणि तिचं ऐकण्यात कोणाचचं भलं नव्हतं.. माझी ही थोडी चूक झाली.. स्वारी खूप घोडचूक झाली.. मी आधीच सांगितले असतं मी विवाहीत आहे.. तर हा प्रकार घडलाच नसता..
(पाच-सहा महिने उलटले असतील.. एका अनोळखी नंबर वरून फोन.. अरे काय हे जगातले कोणाचाच नंबर माझ्याकडे सेव्ह नाही.. सारखे अनोळखी नंबरचे फोन येतात.. फोन उचलला)
मी : हॅलो, कोण बोलतयं
तो : नमस्कार सर, मी अमित बोलतोय.. अक्षदाचा भाऊ..
मी : (अरेच्चा हा काय नवा फंदा) हुं, नमस्कार
अमित : स्वारी सर.. मी तुमच्याशी काही चुकीचं वागलो असेल तर..मी तुम्हाला ओळखू शकलो नाही.. बहिणीच्या प्रेमात वेढा झालो होतो.. आणि खूप खूप धन्यवाद.. माझ्या बहिणीला योग्य प्रकारे समजवल्याबद्दल.. तिनं आमचं कोणाचं ऐकलचं नसतं.. हे मला सुहासनं सांगितलं.. तिचं लग्न ठरलयं मुलगा डॉक्टर आहे.. महत्वाचं म्हटलं तर तो कवी आहे..
पण तुमच्या कविता काही औरचं, मजा येते वाचायला... आता मीही वाचतो नेहमी तुमच्या कविता.. अगदी प्रेमातच पडलोय..
तुमच्या कवितांच्या...
मी : (भारावून) थँक्यू थँक्यू
तो : भेटू लवकरचं
मी : बहुतेक आता शक्य नाही.. कारण मी सिंगापूरला असतो.. सुट्टीला आलो होतो.. (असचं फेकून दिलं कारण भेटण्याचं टाळायचं होतं)
अच्छा बाय बाय
तो : लिहीत रहा, छान छान लिहीत रहा, बेस्ट लक..
बाय बाय..
(त्या दिवशीच मी मोबाईल मधून सिमकार्ड काढून टाकून दिलं आणि नवीन नंबर घेतला तोही कोणाला न देण्यासाठी.. हल्ली कोणाशीही चॅट करण टाळतो आणि अनोळखी नंबरचे फोन उचलत नाही...... )
.
.
🙏 नमस्कार 🙏 धन्यवाद..!
............ समाप्त............






