Saturday, December 31, 2016

Part 6 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )


(जस्ट इमॅजीन)
पुढच्या मेसेज मध्ये तिचा जिन्स व टॉप मधला टॉप फोटो होता.. .





हृदय एकदम घायाळच झालं..
तिचे ते भुरभूरते केस..  हातातल घड्याळ, गळ्यातली चेन तिच्या सौंदर्यात भरच टाकत होती.. एखाद्या सिनेमातली हिराईनच जणू.. .  डोक्यावर लावलेला गागल.. .
टचटचीत तारुण्य भरलं होतं..
माझं मन एकदम प्रसन्न प्रफुल्लित झालं होतं
आत्ताच पाऊस पडून हिरवंगार झाल्यागत झालं होतं. ..
चौथ्या मेसेज मध्ये तिन लिहलं होतं. ..
यातला कोणता फोटो आईंना आवडेल तो दाखव आणि सांग ही तुमची होणारी सून..
(वाचता वाचता मन थोड सुन्न झाले.. कोणता फोटो दाखवायचा या विचारातून मी बाहेर आलो)
पुढं  लिहिले होते..  मी तुझ्या आई आणि आजीला माझीच आई आजी समजून त्यांची सेवा करेन..  तु सोबत आहेत म्हटल्यावर त्यांचाही सांभाळ करेन.. .  तू फक्त छान कविता लिही..  आणि आपल्या लग्नाला सहमती दाखवं... .
.
.
___________मनोज भिलारे 

Friday, December 30, 2016

PART 5 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )

(जस्ट इमॅजीन)..





 (जस्ट इमॅजीन)
दुसर्‍या मेसेज मध्ये सुंदर चूडीदार मधला फोटो होता..
त्या वेशात अगदी रेखीव बांधा, मस्त पाणीदार  बोलके डोळे..  डोळ्यांभोवती काजळाची आरास खूपच मोहक मनाला भावणारी होती..
गर्मीत आईस्क्रीम पागाळावं त्या पेक्षा जास्त गतीने माझं मन पागळले होतं..


.
________मनोज भिलारे

PART 4 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )


(जस्ट इमॅजीन)




मी आतुरतेने तिच्या मेसेज ची वाट पाहू लागलो...
मन सैराट होऊन सैरावैरा धावू लागलं.. मोठ मोठी आणि छान स्वप्न पाहू लागलं.. .
तेवढ्यात एका पाठोपाठ चार मेसेज येऊन थबकले..
पहिल्या मध्ये घरंदाज मुलीसारखा छान साडी मधला फोटो होता.. .डोक्यावर भरजरी पदर हातभरून बांगड्या..
कानात झुब्याची फुलं, बाणेदार नाकातली शानदार नथं, माथ्यावर गोल टिळा अन् गाली लाल मंजूळा आहाहा आणखी काय वर्णु शब्द ही तोकडे झाले.. .
.
_______मनोज भिलारे 

Tuesday, December 27, 2016

Part 3 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )






पुन्हा तिचा रिप्लाय
... " काही हरकत नाही, माझ्याकडे गडगंज संपत्ती आहे, शिवाय मी इंजिनीअर आहे...
मी तूला सांभाळेल ना जानू ... !
तू फक्त छान कविता करं अगदी तूला हव्या तश्या हव्या त्या विषयावर... "
(मेरे मन मे फिर एक लड्डू फूटा... )
मी रिप्लाय केला..  "मी सोबत येईन ही पण
माझ्या वयोवृद्ध आई आणि आजी त्यांच काय करूयात.. .
.
____________मनोज भिलारे

Sunday, December 11, 2016

Part 2 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )


तुम्ही माझ्याशी लग्न कराल..?
Part 2
.
पुढे तीने लिहिले होते
"तुमच्या कविता खूप खूप छान आहेत...
तिच्यावरच्या कविता मला लय आवडल्या
तुमचे फोटो तर एकापेक्षा एक सरस.. .
"
मी आपला लगेच हरबर्याच्या झाडावर
तसा थोडा घाबरलोही आणि दरदरून पावसाळ्यात घाम फुटला.. .
मी रिप्लाय दिला..
"मी गरीब आहे..आणि माझ्या ही काही जबाबदार्‍या आहेत, तुझ्याशी सध्यातरी लग्न करू शकत नाही..
त्यात लिहीण्याचं वेढ त्यामुळे चांगली नोकरी करू शकत नाही. .! "
.
_____________मनोज भिलारे

Saturday, December 10, 2016

Part 1 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )


Part 1

"तुम्ही लग्न कराल का माझ्याशी? "
असं त्या गर्भ श्रीमंत मुलीने मला शेवटी विचारलचं....

मी आ वासून मेसेज वाचत राहीलो. ..

(brain was hang)

__________मनोज भिलारे