(जस्ट इमॅजीन)
तेवढ्यात मागून एक आवाज आला.. आय्या मनोज भिलारे खरचं... पाहीलं तर ती मघाशीच मुलगी.. मी सुहास ला डिवचलं
सुहास : हो हे मनोज भिलारे आणि या आमच्या पोजेक्टच्या ज्युनियर इंजनियरीन बाई मंजूषा गायकवाड, (कॅमेरामन ला) एक फोटो घे रे..
(त्याने फोटो घेतला ते लोडनं शेजारी उभ होतं)
मी निघालो मागोमाग ती होतीच मी थांबलो आणि म्हणालो काय ते एकदाच सांगा बाई..
मंजुषा : एवढे वैतागू नका आणि बाई म्हणू नका.. माझ नाव मंजुषा आहे.. मी तुमच्या कविता वाचते खूप छान असतात.. खूप आवडतात
मी : स्वारी, थँक्स..
ती : मला तुमचा नंबर हवा आहे.. (स्वतःचा मोबाईल काढता काढता बोलली)
मी : 80-875-36-718 (वाळला नवीन डोक्याला ताप नको म्हणून चुकीचा नंबर देऊन निघालो)
ती: हा तर नंबर लागत नाही (लगेच तीने तपासून पाहीला होता, हुशारच)
मी : (मोबाईल काढता काढता) रेंज नसेल
ती : दुसरा द्या.
मी : 9822-170-105 (ही बया पाठ सोडेना म्हणून खरा नंबर देऊन टाकला..
ती: मिस्कॉल करते हां, हा माझा नंबर..
मी पुन्हा या सगळ्या प्रकाराचा विचार करत स्टँन्डवर पोहचलो..
एकतर मी एवढा प्रसिद्ध कधी न्हवतोच.. अय्या मनोज भिलारे खरचं.... यवढं म्हणण्या इतपतं तरी..
मधून मधून मागे पहातच होतो आणि बिचारी मागावर तर नाही ना हे पाहण्यासाठी..
आता जवळपास 7 वाजले होते... चहा घेतला नी गाडी धरली.. तिकीट काढतानाच कंन्डक्टरला सांगली आल्यावर उठवण्याची विनंती केली.. गाडी थोडी रिकामीच होती.. कमीत कमी धक्के लागावेत या हिशोबाने मधली शिट पकडली.. कारण सकाळी लवकर उठल्याने खूप आळस आला होता.. झोप आलीतर सोय व्हावी म्हणून....
(रेल्वेच टाईम जुळत नाही आणि ट्रॅव्हल्सच बजेट जूळत नाही त्यामुळे मस्त मधला पर्याय एस्टी)
लाईटांचा झगमगाट पहात पुणे सोडले आता सारा काळोख आणि वाहनांचे उजेड दिसत होते मधून मधून रस्त्याशेजारचे विजेच्या खांबाची पंगत दिसत होती. तसेच वस्त्यांच्या आलीकडं पलीकडं धाब्यांची रोषणाई पाहता पाहता डोळा कधी लागला गाडी कुठ कुठ थांबली काही कळालच नाही.. सांगलीत आल्यावर कंडक्टरनी हालवून जागं केलं..
.
.. क्रमशः
______मनोज भिलारे

No comments:
Post a Comment