Tuesday, October 3, 2017

PART 25 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.? )


(जस्ट इमॅजीन)


पोहे खाऊन स्टँड मध्ये पोहचलो..  आणि समोरच पुणे गाडी लागली होती..  एस्टीत चढलो.. आणि ऐस पैस पाय पसरून बसलो..  सकाळची वेळ असल्याने गाडी बर्‍यापैकी रिकामीच होती..  पाचेक मिनीटात गाडी सुटली..  हळूहळू अंधार मिटत होता आणि सुर्य उगवत होता.. एकदम प्रसन्न अल्हाद दायक वातावरण होते.. खूप छान वाटत होते..
मी शिटवर एकटाच असल्याने थोड कंटाळवाण वाटत होतं, साधारण 8 - 8.30 वाजले असतील साताऱ्यात पोहचलो होतो..  आता थोडी वरदळ वाढली होती.. कामासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, कार्यक्रमासाठी आणि दवाखान्यात जाण्यासाठी अशा विविध कारणांनी एस्टीत गर्दी वाढत होती.. सर्व शिट जवळजवळ भरल्या होत्या. माझ्या शेजारी एक गृहस्थ आपल्या मुलासोबत येऊन बसले होते.. काही वेळातच त्यांचा छोटासा मुलगा खिडकी शेजारी बसण्याचा हट्ट करू लागला..  मी चांगुलपणा दाखवत.. मी आलीकडे सरकलो आणि त्यांना पलिकडे खिडकीजवळ बसण्यास सांगितले..  थोडा ही नकार न नोंदवता मुलासाठी बिचारा बाप खिडकीजवळ बसला..
एक एक स्टॉप उलटत होते तसतशी गर्दी वाढतच होती..  आता उभे राहण्यासाठीही जागा शिल्लक नव्हती.. कात्रजला गाडी थांबली तसे काही लोक उतरले तसे त्या पेक्षा जास्त लोक एस्टीत चढलेही.. त्या मधे वयोवृद्ध एक वाकलेली आजी डोके वर काढत चढली..  तिने काठी टेकत टेकत इकडे तिकडे बसण्याचा प्रयत्न केला पण तिला जो तो धुडकावून लावू लागला..
मधून मधून कंडक्टरचा आवाज येतच होता..  चला पुढे सरका, बोला तिकीट..  चला पुढे...
या गोंधळात ती आजी माझ्यापर्यंत येऊन पोहचली होती.. आणि म्हणाली..  लेकरा, जरा सर तिकडं जरा बसायला जागा दे...
तसा मी पटकण चांगुलपणा दाखवत उठलो आणि आजींना बसायला जागा दिली... काही वेळातच आजीच्या ओळखीच्या एक इसम त्यांच्या जवळ येऊन उभा राहिला..  आणि आजी सोबत हितगुज रंगल..
गाडी मुळशिंग पर्यंत पोहचली होती...  आजी उठल्या आणि त्या धुळकट चेष्मातून एक नजर माझ्या कडे टाकली आणि ओळखीच्या इसमाला बसायला जागा दिली.. मी अश्चर्याने बघत राहिलो..
ते म्हणतात ना मदत केली आणि.....  तसचं काहीसं घडलं होतं आणि चांगुलपणा म्हणून मुळशिंग पासून पुणे स्टेशन पर्यंत उभा राहून प्रवास केला होता.. पायाला नुसते गोळे येत होते..
पुणे स्टेशनला उतरलो सकाळचे 11 वाजले होते..
पत्रिकेवर पत्ता पुन्हा एकदा पाहीला पुणे स्टेशन मागे,  पाटील मंगलकार्यालय असा पत्ता होता..
.
.


____मनोज भिलारे

No comments:

Post a Comment