Wednesday, January 11, 2017

PART 8 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )







आता माझी चाणाक्ष बुद्धि काम करू लागली... 
विचारात पडलो ही पोरगीतर कवितांवर फिदाच झालीया.. .  हिला आपल्या पेक्षा कविताच जास्त आवडत्यात. .
मग मनाला समजावलं, असो म्हटलं जेवण मिळतयं ना पोटभर जेऊन घेऊ..
मग मी मेसेज केला त्यात लिहीलं..
"माझी एक बहीण आहे तिच्या लग्नाची आणि तसचं लहान भाऊ आहे तो कॉलेज करतोय त्याच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे.. .  ती पार पाडणं हे माझं पहिलं कर्तव्य..
नंतर आपलं काय असेल ते पाहू... "
.
. __________मनोज भिलारे

Sunday, January 1, 2017

PART 7 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )


 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी ..?  भाग 7)


आता माझ्या मनाचे पाखरू.. .  फुलाकडे पुर्णपणे खेचले गेले होते... हत्ती वरून पेढे वाटावेत इतका आनंद झाला...
पेढ्यांसाठी खिश्याकडे हात वळला आणि भानावर आलो.. .
मीही छानसा फोटो पाठवून दिला.
तिचा तत्काळ रिप्लाय आला..
लव्ह यू डियर...
सोबत तिने एकुलती वारस असल्याचा उलगडा करत तिने स्वतःच्या लाडाचे आणि हट्टीपणाचे किस्से सांगत संपत्तीचा सातबारा उभा केला. त्या लांबसडक मेसेज मध्ये तिच्या आई बाबांच कौतूक करायला विसरली नव्हती..
आणि पुन्हा शेवटी
लव्ह यू डियर तू फक्त लिही मी सारं सांभाळेन असा  उल्लेख केला..
.
.
_______मनोज भिलारे