(जस्ट इमॅजीन)
.
कसेबसे सहा वाजले अॉफीस सुटले..
माझे मात्र बारा वाजले होते, कारण एक म्हणजे पोटात चांगलीच आग पडली होती आणि दोन म्हणजे सकाळी निघताना संध्याकाळी बोलू असे सांगितल्याने राहिलेली औषध घरी पाहताच मिळणार होती..
पोटाला मिळेल की नाही.. याची शंकाच होती..
अॉफीस मधून याच विचाराने एका हॉटेलमध्ये घुसले दोन प्लेट भजी घेतली.. गटागट अधाश्यासारखी खाल्ली, आणखी भूक होती पण राहू दे म्हटलं घरी जेवण नाही गेलं तरं औषधाचे डोस डबल होतील म्हणून..
मग चहा घेतला आणि घरी निघालो.. जरा आळम् डळम् करत मुद्दामच उशिरा घरी पोहोचलो...
खूप कामाने वैतागल्यासारखा आव आणत घरात घुसलो.. आई स्वयंपाक बनवत होती बहीण मदत करत होती.. भाऊ आणि आजी टिव्ही पाहत होते..
(मनात म्हटले हीनं माहेर गाठलं वाटतं, आता सगळ्या सासूरवाडीत सोहळा होतोय आपलाच)
बॅग काढता काढता आईला विचारलं.. आई ही कुठं हळदी कुंकवाला गेली आहे का गं..
आई : अरं बाबा सकाळच्यानं बोलत न्हाय, खात न्हाई, पित न्हाई.. नुसतीच झोपलीया खोलीत....
तू इचार काय दुखतय का.. तुलाच सांगल ती आणि घेऊन जा इस्पितळात...
.
मी आईला बोललो.. बघतो मी..
(जिव जरासा भांड्यात पडला पण दिल्ली अभी बहोत दूर थी)
रूम जाऊन फ्रेश झालो...
जवळ जाऊन बसलो.. न बोलताच शेजारच पुस्तक उचललं आणि वाचल्यासारखी नजर फिरवू लागलो..
एक दिड तास असाच गेला... तेवढ्यात बाहेरूनच जेवणासाठी आवाज आला.. मी आतून सांगितले माझं आणि वहिनचं ताट इकडच आणून दे प्लिज..
ती न बोलता निघून गेली आणि दहा मिनिटातच दोन ताट जेवण घेऊन आली नंतर पाणी ही घेऊन आली.. आणि म्हणाली काही लागलं तरं आवाज दे आम्ही पण जेवायला बसतोय..
मी थँक्यू म्हणालो
असं काय रे दाद्या, म्हणत ती निघून गेली
.
.
क्रमशः
____मनोज भिलारे

No comments:
Post a Comment