Part 11 (जस्ट इमॅजीन)
तिच्या रिप्लाय ची वाट पहाता पहाता डोळा कधी लागला आणि रात्र कधी उजाडली काही कळालचं नाही...
जाग येताच रात्रीचे विचार पुन्हा कसरत करू लागले..
डोळे चोळत मोबाईल शोधू लागलो तिचा रिप्लाय पहाण्याची खूप उत्सुकता लागली होती
(जशी माझ्या मित्रांनो तुम्हाला ही लागली आहे)
कारण त्या रिप्लाय वर माझ भविष्य आणि आयुष्य बदलणं अवलंबून होतं..
होकार मिळाल्यास सर्व क्षणात पलटणार होतं
आणि नकार असल्यास कधीच पुढे न जाणारा बे चा पाढा होताच पुन्हा..
उशी खाली, आजूबाजूला, सर्व अंथरून झटकून पाहीले, सर्व घरं पालथे घातले मोबाईल काही दिसेना...
सकाळी सकाळी मेंदूतून स्वतः वरच आग ओकू लागलो... वैतागून जिव गेल्यासारखे, हारून आल्यासारखे खांदे पाडून डोळे मिटतं कपाटाला टेकून बसलो...
.
.
___मनोज भिलारे

No comments:
Post a Comment