(जस्ट इमॅजीन)
.
मी आवाज दिला..
अहो ऐकलत का.. उठा आता.. खाऊन घ्या थोडसं
(अजिबात प्रतिक्रिया नव्हती)
जेवणावर कसला राग करायचा तो..
खाऊन घ्या आणि काय बोलायचं ते बोलून घ्या..
मी अपराधी आहे मान्य आहे.. तुम्ही द्याल ती शिक्षा कबूल..
(एवढं सांगून सुद्धा काहीच प्रतिक्रिया नाही, मी उठून किचनकडे गेलो)
बहीण : काय हवं आहे का दादा
मी :काही नको, तु जेव..
(दोन रिकामी ताट घेऊन माझ्या खोलीत आलो जेवणाची ताटं झाकत)
मी :स्वतःला कशाला शिक्षा करतेस, प्लीज जेऊन घे..
तू नाही जेवलीस तर मीही नाही जेवणारं
सकाळपासून निरंकार उपास चालूच आहे.. आता असा उपाशीच झोपतो.
(असं बोलून विरूद्ध दिशेला तोंड फिरवून झोपलो, बरं झालं भजी तरी खाऊन आलो नाहीतर काही खरं नव्हतं माझं, रिकाम्या पोटानं आपलं टकूरं लगेच आणि लै तापतयं, भर होती म्हणून सारं शांत होतं)
दहा पंधरा मिनिटांनी बहुतेक तिकडेही कावळे ओरडत असावेत..
ती: अहो ऐकलत का
(आता माझी बारी आली होती, मी घट्ट डोळे मिटून मौनातचं)
ऐकताय ना, उठा ना, जेऊन घेऊ..
मी :भूक नाही
ती: असं कसं चालायचं, खाल्लं नाही तरं काम करायला ताकद कशी यायची..
तुम्ही अशक्त झाला की सारं घर अशक्त होतं..
उठा आता,
मी (उठत उठत) : तू अशक्त असलीस तर मी अशक्त होतो.. चल जेऊयात.. पुन्हा जेवणावर राग कधी काढू नको..
(दिवसभर रडून तिचे डोळे लालबुंद झाले होते, बाकी काही न बोलता जेवण उरकले)
(भांडण मिटल्याने मनोमन मोकळा श्वास घेतला)
.
.
क्रमशः.......
.
((मित्रांनो तुम्हाला काय वाटतं??
ही कथा संपली??
इथं ही कथा संपवायला पाहिजे??
खरचं भांडण संपल असेल??
ती प्रेमकथा संपली असेल??
बायकोनं आईला किंवा इतरांना काही सांगितलं असेल??
कथेला नवीन वळण लागेल का??
.
.
.
तुमच्या प्रतिक्रियाच पुढची कथा ठरवतील...!
तुमच्या प्रतिक्रिया लिहायला भाग पाडतील ही अपेक्षा..?))
.
______मनोज भिलारे

No comments:
Post a Comment