(जस्ट इमॅजीन)
एक एक मेसेज पुढे पुढे वाचत होतो.. सगळे तिचे म्हणजे अक्षताचे मेसेज होते.. आभाळ एकदमच भरून यावं आणि धुवांदार बरसावं तसं काही दहा मिनिटे झाले तरी मेसेज येतच होते. वाचण्याच्या नादात रिप्लाय देणं जमलचं नाही..
मेसेज अनुक्रमे
1.तूझ्या इतका स्वार्थी माणूस पाहीला नाही आज पर्यंत स्वतःला फार शहाणा समजतोस नालायका..
मला दुःखविण्या साठीच तू ही खेळी खेळलीस..
मी तुझी इतकी काळजी करते आणि तू असा निघालास..
2.परमेश्वर इतका कठोर असेल आणि माझ्याशी निर्घृण चेष्टा करेल असं स्वप्नात देखील वाटलं नाही
3.चित्रपटातला विलन बरा किमान तो सरळ वार तरी करतो कोणाच्या मनाशी असा खेळ करत नाही..
4.तू नीच आहेस, हलकट आहेस, हरामखोर, लांडगा, धूर्त कोल्हा आहेस.. तूला लाज कशी वाटली नाही.. मला फसवताना.. निर्लज्जपणाचा कळस आहे..
5. मला तुझं काळं तोंड कधीच दाखवू नकोस, एवढ्या जगात तूला उल्लू बनवायला कोणी भेटलचं नाही का..
माझी चूक एवढीच की मी माणूस ओळखायला चुकले आणि आयुष्यातली ही सर्वात मोठी माझी चूक होती..
6. पुन्हा कोणाच्या आयुष्याशी खेळू नको...
रेड्या, म्हसोबा मी तुला आयुष्यात कधीच माफ करणार नाही..
7. मला उध्वस्त केलसं.. मला जगायची इच्छाच सोडली नाहीस.. खूप हताश केलस.. या आधी कोणीच मला इतकं दुःखवलं नव्हतं
8. काही तरी फडतूस लिहीतोस.. आणि स्वतःला मोठा कवी समजतोस नीच माणसा.. तूला ओळखतं का कोणी हरामी कुठचा..
9. शब्द जुळवून कोणी कवी होत नसतं... माझ्याशी लग्न करायची तुझी लायकी तरं आहे का..
दळभद्री, भिकारडा कुठचा.. तुझ्या सारखे छप्पन मागे आहेत..
10. तुझ्या महीण्याच्या पगाराइतका माझा दिवसाचा खर्च आहे.. तू काय समजलास स्वतःला, तूला अद्दल घडवल्या शिवाय सोडणार नाही.. गाठ माझ्याशी आहे.. फालतू कुठचा हरामी कुत्रा.. . बिनकामाचे शहाणे गळ्यात पडतात..
,,,,,,,,,,,,,,,,,
.,,,,,,,,,,,,
.
क्रमशः
.
______मनोज भिलारे

No comments:
Post a Comment