Friday, September 29, 2017

PART 16 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)





 (जस्ट इमॅजीन)
सकाळी सकाळी पार हिरमोड झाला होता, या सार्‍या दंगलीत अॉफीसात पोहचता पोहचता 10.30 होऊन गेले.. नशीब आजून सिनीयर आले नव्हते..  आधीच अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला होता..
फाईलींच्या गठ्यांनी आधीच टेबलला हजेरी लावली होती..  मस्टरवर सही करून मोर्चा फाईलींकडे वळवला आणि कंप्युटर चालू केला..
कामात काही लक्षच नव्हते म्हणा..  रात्रीचा विषय आजून डोक्यात लोणच्यासारखा मुरत होता.. आदी त्याची विल्हेवाट लावल्याशिवाय कामात लक्ष लागायचं  नाही म्हणून आदी नेट चालू केलं..  बर्‍याच प्रयत्नांनी ते चालू झालं... फेसबुक चालू केलं आणि तिचा मेसेज हुडकण्यात मग्न झालो..
तेवढ्यात सिनीयर कधी मागे उभे राहिले काही कळालचं नाही..  काय भिलारे आज सकाळी सकाळी..  अर्धवट वाक्य तोडत त्यांनी केबीनमध्ये बोलावलं.. मी सर्व बंद करून त्यांच्या केबीनमध्ये गेलो. एवढा समोर कामाचा ढिग दिला असताना तुमचं फेसबुकवर काय..  तुम्हाला काम होतय की नाही हे गुराळ चालू झालं..
क्लायंटचा मेसेज शोधत होतो थुका पॉलीश करून तिथून ही निसटलो.. आणि सरळ माझ्या टेबलावर येऊन कामाला सुरुवात केली..
अधून मधून फेसबुक उघडून तिचा मेसेज आलाय का पाहू लागलो..  दुपारी एक वाजता जेवणाची सुट्टी झाली सकाळच्या संचारबंदीने जेवणावर बंदी आणली होती. सकाळ पासून निरंकारी उपवास घडलाच होता आणि डबा नसल्याने समोरच्या हॉटेल मध्ये जाऊन नाष्टा केला आणि चहा सांगितला..
 (ढग पाहून ओळी पुटपुटणारा मी) बाहेर काळेभोर ढग दाटले होते तरीही मी माझ्याच विचारात चहा पिऊन अॉफीसात पोहचलो..  फेसबुक पाहीले.. तर टपाटप मेसेज टपकत होते..
.
क्रमशः........
.
.
_________मनोज भिलारे

No comments:

Post a Comment