Friday, September 29, 2017

PART 15 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी.?)



 (जस्ट इमॅजीन)
जवळ जाऊन खांद्यावर मी हात ठेवला तसा तिने एक हजार होल्टचा करंट लागावा तसा झिडकारला आणि अखेर मौनाचा बांध फुटला...
तापलेल्या सुर्यासारखे लालबुंद डोळे..  अचानक वादळाला उधाण यावं तसं काहीसं...  तोंडाच्या तोफखान्यातून आग ओकू लागली...
काय चाललंय हे??  काय कमी पडलेयं???  कशाला हवेत नसते धंदे??  रात्रभर भवाण्यांबर काय बोलायचं ते??  माझ्याशी बोलायला कधी दोन मिनिटे वेळ नसतो...
(ऐकून डोक्यात ट्युब पेटली मोबाईलची पेस्ट कशी झाली..  आता माझे मौन होते आणि तिकडून आक्रमण चालू होते)  माझं नशीब..  फुटलं रे देवा...  कोणाशी गाट मारलीस रे बाबा..  माझ्यावरच का हा प्रसंग..
मी काय तुझं वाकडं केलं...  असलं माझ्या पदारात टाकलसं..  (मी समजवायचा प्रयत्न करत होतो पण तिची ऐकण्याची तयारी दाखवेना कसंबसं करून घरात न्हेलं) आणि बोललो फक्त मेसेज मध्ये बोललो होतो..  बाकी काहीही केलं नाही..  आणि सूरवात तर तिनं केली होती..
पुन्हा विजेसारखी कडाडली...  म्हणाली म्हणजे मी सगळ होईपर्यंत वाट बघत बसायचं होतं..  उद्या त्या सटवीला सवत करून घ्यायचं होत आणि माझा देवगुणी नवरा तिला साथ देणारं आणि तूम्ही कविता कविता खेळत बसणार आणि मी प्रेक्षक होऊन टाळ्या पिटत बसते..  तूम्ही करा घराण्याचे नाव मोठं..
मी आपला न ऐकल्या सारखं करून अॉफीससाठी वेळ होतोय संध्याकाळी बोलू म्हणतं निसटलो..
.
.



___मनोज भिलारे 

No comments:

Post a Comment