तळपायाची आग मस्तकात पोहचली होती.. बेडरूम मधून बाहेर येता येता मी तापट स्वरात अहो ऐकलं का...? कुठ आहे तुम्ही...? काय करताय..? माझा मोबाईल पाहीला का?
घरात एकदम भयाण शांतता पसरली होती.. फक्त माझा आवाज घुमत होता.. या वेळी रोज फक्त सौ घरी असायच्या पण त्या ही दिसेना झाल्या होत्या..
अजिबात काही सुचत नव्हते.. मोबाईल बंद पडलाय, बायको घरात नाही, आॅफीसला ही उशीर होतोय..
तरी सुद्धा सर्व खोल्या आवाज देत देत ढुंडाळल्या..
टेरेस पालथे घातले..
काही दिसेना.. माहेरला एक - दोन दिवस जातानाही पन्नास वेळेला जाऊन येते सांगणारी, दुध वेळेवर तापवा, जास्त पसारा करू नका.. एक ना अनेक..
आणि ती अचानक अशी कुठ गेली.. सुट्टी टाकून सारं निपटावं म्हटलं तर मोबाईल वारीला गेलेला आणि त्यात सारे नंबर..
पटापट अवरायला सुरवात केली..
अंघोळ वगैरे अटपून चहाच पातेलं गॅसवर चढवलं..
आणि बिनसाखरेचा चहा पचवत अॉफीससाठी बाहेर पडलो..
.
.___________ मनोज भिलारे

No comments:
Post a Comment