Wednesday, January 11, 2017

PART 8 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )







आता माझी चाणाक्ष बुद्धि काम करू लागली... 
विचारात पडलो ही पोरगीतर कवितांवर फिदाच झालीया.. .  हिला आपल्या पेक्षा कविताच जास्त आवडत्यात. .
मग मनाला समजावलं, असो म्हटलं जेवण मिळतयं ना पोटभर जेऊन घेऊ..
मग मी मेसेज केला त्यात लिहीलं..
"माझी एक बहीण आहे तिच्या लग्नाची आणि तसचं लहान भाऊ आहे तो कॉलेज करतोय त्याच्या शिक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे.. .  ती पार पाडणं हे माझं पहिलं कर्तव्य..
नंतर आपलं काय असेल ते पाहू... "
.
. __________मनोज भिलारे

No comments:

Post a Comment