Saturday, December 31, 2016

Part 6 (तुम्ही लग्न कराल का माझ्याशी..? )


(जस्ट इमॅजीन)
पुढच्या मेसेज मध्ये तिचा जिन्स व टॉप मधला टॉप फोटो होता.. .





हृदय एकदम घायाळच झालं..
तिचे ते भुरभूरते केस..  हातातल घड्याळ, गळ्यातली चेन तिच्या सौंदर्यात भरच टाकत होती.. एखाद्या सिनेमातली हिराईनच जणू.. .  डोक्यावर लावलेला गागल.. .
टचटचीत तारुण्य भरलं होतं..
माझं मन एकदम प्रसन्न प्रफुल्लित झालं होतं
आत्ताच पाऊस पडून हिरवंगार झाल्यागत झालं होतं. ..
चौथ्या मेसेज मध्ये तिन लिहलं होतं. ..
यातला कोणता फोटो आईंना आवडेल तो दाखव आणि सांग ही तुमची होणारी सून..
(वाचता वाचता मन थोड सुन्न झाले.. कोणता फोटो दाखवायचा या विचारातून मी बाहेर आलो)
पुढं  लिहिले होते..  मी तुझ्या आई आणि आजीला माझीच आई आजी समजून त्यांची सेवा करेन..  तु सोबत आहेत म्हटल्यावर त्यांचाही सांभाळ करेन.. .  तू फक्त छान कविता लिही..  आणि आपल्या लग्नाला सहमती दाखवं... .
.
.
___________मनोज भिलारे 

No comments:

Post a Comment